आसारामजी बापू यांना कारागृहातून पॅरोलवर मुक्त करण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

आसारामजी बापू यांना कारागृहातून पॅरोलवर मुक्त करण्याची मागणी

 आसारामजी बापू यांना कारागृहातून पॅरोलवर मुक्त करण्याची मागणी

हिंदुराष्ट्र सेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच च्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना ची लागण झाल्यामुळे  आसारामजी बापू यांना कारागृहातून पॅरोलवर मुक्त करण्याच्या मागणीसाठी हिंदुराष्ट्र सेना व श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. यावेळी हिंदूराष्ट्र सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष परेश खराडे, शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष बाप्पू ठाणगे, शिवप्रतिष्ठानचे विनोद काशीद, शहर प्रमुख घनश्याम बोडखे, महेश निकम, सागर ढूमणे, सचिन पळशीकर, केशव मोकाटे, गणेश घाडगे, गोकुळ धाडगे, संतोष धाडगे आदी उपस्थित होते.
आसारामजी बापू मागील आठ वर्षापासून जोधपूर कारागृहात बंद आहे यांचे वय 84 वर्ष असून त्याचे कारागृहातील वर्तन अत्यंत चांगले आहे आसारामजी बापू यांना कोरोना ची लागण झाली आहे सुप्रीम कोर्टाने कोविंड 19 च्या पार्श्वभूमीवर कारागृहातील कैद्यांनबाबतीत दिलेल्या एका आदेशान्वये 70 वर्षावरील विविध व्याधिग्रस्त कैदी पॅरोलवर मुक्तक करण्यात यावेत असे नमूद केले आहे असे असूनही जोधपूर कारागृह प्रशासन कशाची वाट पाहते आहे? देशातील सेलिब्रिटींना वेगळा न्याय आणि आसाराम बापू यांना वेगळा न्याय सेलिब्रिटी संजय दत्त याला केवळ चाहत्यांच्या मागणीवरून शिक्षेतून एक वर्ष सुटका दिली आहे तर सलमान खान यांच्या करिता रात्री बारा वाजता कोर्टाचे दरवाजे उघडले आहेत आसारामजी बापू हे मात्र हेतुपुरस्सर बंदीवासात ठेवले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाचा न्याय यंत्रणेवरील विश्वास कमी होताना दिसत आहे सामाजिक न्याय मध्ये विषमता दिसते म्हणून आसारामजी बापू यांचे वय व त्यांना असलेले आजार याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना पॅरोलवर त्वरित सुटका करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment