जागरूक नागरिक मंचचे हात नागरिकांनी बळकट करावेत ः आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

जागरूक नागरिक मंचचे हात नागरिकांनी बळकट करावेत ः आ. संग्राम जगताप

 जागरूक नागरिक मंचचे हात नागरिकांनी बळकट करावेत ः आ. संग्राम जगताप

प्रभावी करोना प्रतिबंधक व्हायरोशिल्ड स्प्रेचे प्रथमच वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जागरूक नागरिक मंचने करोना प्रतिबंधासाठी प्रभावी ठरलेल्या व्हायरोशिल्ड स्प्रे प्रथमच उपलब्ध करून देत शहरातील कोविड सेंटरमध्ये सेवा देणार्‍या करोना योद्धांना सुरक्षा कवच दिले आहे. जागरूक नागरिक मंच कायमच वेगळे काम करत नगर मधील विविध समस्यांमध्ये हात घालून प्रश्न मार्गी लावत आहेत. सुहास मुळे यांच्याही घरात करोना मुळे दु:खद घटना घडली आहे. त्यामुळे इतरांच्या घरात अशा दु:खद घटना घडू नये म्हणून ते काम करत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्यात नागरिकांनी सहभागी होत सुहास मुळे यांचे हात बळकट करावेत, असे आवाहन आ.संग्राम जगताप यांनी केले.
कोविड संसर्गापासून बचाव करणारा व्हायरोशिल्ड हा स्प्रे जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाला आहे. या स्प्रेचे प्राधान्याने शहरातील विविध कोविड सेंटरमध्ये सेवा देणार्‍या करोना योद्धांना मोफत वाटप करण्यात आले. गुरु अर्जन देव निःशुल्क कोविड केअर सेंटर मधील करोना योद्धांना आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते व्हायरोशिल्ड स्प्रेचे वाटप करण्यात आले. यावेळी सभापती अविनाश घुले, हरजीतसिंग वधवा, माजी नगरसेवक सचिन जाधव, सचिव कैलास दळवी, अमेय मुळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात सुहास मुळे म्हणाले, तळहातावर आपला जीव घेत काम करणारे करोना योद्धांना मदत करण्याच्या भावनेने व्हायरोशिल्ड स्प्रे या 99 % गुणकारी असलेल्या स्प्रेचे वाटप केले आहे. करोना योद्धे असलेले सेनापती जर सुस्थितीत राहीले तर हे करोना विरोधातील युद्ध आपण सहज जिंकू. नगर मधील अजून जिल्हा रुग्णालय, अमरधाम येथे सेवा देणार्‍या 150 हून अधिक करोना योद्धांना या स्प्रेचे वाटप करायचे आहे. 200 रु किमंत असलेल्या या स्प्रेसाठी दानशुरांनी मदत करावी, असे आवाहन केले.सुहास मुळे यांच्या या आवाहनास त्वरित प्रतिसाद सभापती अविनाश घुले यांनी 15 स्प्रे साठी, हिंद सेवा मंडळाचे माजी सचिव सुनील रामदासी 10, प्रेरणा एंटरप्राईजेसचे डावरे यांनी व हारजीतसिंग वधाव यांनी 10 स्प्रेसाठी मदत दिली. यावेळी सुनील कुलकर्णी, योगेश गणगले, प्रसाद कुकडे, राजेंद्र पडोळे, मनोज कुमार, राजा नारंग, राहुल बेग, कैलास नवलानी, किशोर मुनोत अर्जुन मदान, सुरज तोरणे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment