प्रभागातील नागरिकांना सुविधा पुरविण्यास कटीबद्ध ः अविनाश घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

प्रभागातील नागरिकांना सुविधा पुरविण्यास कटीबद्ध ः अविनाश घुले

 प्रभागातील नागरिकांना सुविधा पुरविण्यास कटीबद्ध ः अविनाश घुले

कानडे मळा ते सोलापूर महामार्गाला जोडणार्‍या रस्त्याचे पॅचिंग


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कानडे मळा ते सोलापूर महामार्गाला जोडणारा रस्ता हा अत्यंत खराब झाला होता. पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने चालणेही  मुश्किल होत. नागरिकांनी रस्ता दुरुस्तीचे मागणी केल्यानंतर पाहणी करुन संबंधितांना रस्ता दुरुस्तीबाबत सूचना दिल्यानंतर आता या रस्त्यांवरील खड्डे बुजावून पॅचिंग करण्याचे काम हाती घेतले आहे. या पॅचिंगमुळे रस्ता खड्डेमुक्त होणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम होत असल्याने पावसाळ्यात नागरिकांनाची त्रासापासून मुक्तता होणार आहे. हा महामार्गाला जोडणारा रस्ता असल्याने परिसरातील नागरिकांची वर्दळ या रस्त्यावर होत असते. पुढील काळात या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. याच प्रमाणे प्रभागातील  रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर ड्रेनेज, पिण्याच्या पाईपलाईन आदि कामेही केली आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कामात व्यत्यय असला तरी आवश्यक कामांना प्राधान्य दिले जात आहे. त्याचबरोबर प्रस्तावित कामे होण्यासाठीही पाठपुरावा सुरु असून पुढील काळात तिही कामे मार्गी लागतील, असा विश्वास मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्र.11 मधील कानडे मळा ते सोलापूर महामार्गाला जोडणार्या रस्त्याच्या पॅचिंग कामाची  सभापती अविनाश घुले यांनी पहाणी करुन संबंधितांना सूचना दिल्या. याप्रसंगी मोढवे काका व परिसरातील नागरिक उपस्थित होते. रस्त्याच्या पॅचिंग काम सुरु झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करुन अविनाश घुले यांना धन्यवाद दिले.

No comments:

Post a Comment