कोरोना झालेल्या अपंग व्यक्तीच्या कुटुंबीयांचा वहिवाटीचा रस्ता बंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 28, 2021

कोरोना झालेल्या अपंग व्यक्तीच्या कुटुंबीयांचा वहिवाटीचा रस्ता बंद

 कोरोना झालेल्या अपंग व्यक्तीच्या कुटुंबीयांचा वहिवाटीचा रस्ता बंद

रस्ता खुला करुन देण्यासाठी अपंग व्यक्तीचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन; रस्ता बंद करणार्यांवर कारवाईची मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना झालेल्या अपंग व्यक्तीच्या कुटुंबीयांचा वहिवाटीचा रस्ता बंद करण्याचा धक्कादायक प्रकार रूपेवाडी (ता. पाथर्डी) येथे घडला आहे. पोपट केरु शेळके या दिव्यांग व्यक्तीने जिल्हाधिकारी कार्यालयात वहिवाटीचा बंद करण्यात आलेला रस्ता खुला करुन देण्यासाठी निवेदन दिले आहे. अन्यथा पाथर्डी तहसील कार्यालया समोर सोमवार दि. 7 जून पासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
5 एप्रिल रोजी शेळके कुटुंबीयांना कोरोना झाल्याचे कळाल्याने त्यांच्यावर अहमदनगर शहरात उपचार सुरु होते. गावाकडे  येण्या-जाण्यासाठी पारंपारिक रस्त्याचा वापर करावा लागत होतो. मात्र कोरोना कोरोना झाल्याच्या भितीने बाबासाहेब मोहिते व कांताबाई मोहिते यांनी शेळके कुटुंबीयांचा वहिवाटीचा रस्ता झाडांच्या फांद्या व लाकडे टाकून बंद केला आहे. सदर रस्ता मोहिते यांच्या घराजवळून जात असल्याने कोरोनाच्या भितीने हा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. सदर रस्ता बंद केल्याची विचारणा केली असता घराच्या शेजारून जाऊ नका तुमच्या मुळे कोरोना होणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले. रस्ता बंद केल्याने कुटुंबीयांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अपंग असल्याने घरा पर्यंत जाण्यासाठी मोठ्या अडचणी येते आहे. वाहन एकीकडे लाऊन पर्यायी रस्त्याने जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. सदर प्रकरणी सरपंच, ग्रामसेवक व पाथर्डी तहसिलदार यांच्याकडे तक्रार करुन देखील या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे तक्रारदार पोपट शेळके यांनी निवेदनात म्हंटले आहे.
बंद करण्यात आलेला रस्ता घोडेगाव, मिरी या मुख्य रस्त्याला जोडणारा आहे. रस्ता बंद असल्याने उत्तरेकडील नागरिकांना याचा त्रास होत आहे. मात्र मोहिते परिवार हा रस्ता खुला करण्यास तयार नाही. मोहिते कुटुंबीयांनी दिव्यांग व साथरोग प्रतिबंधक कायद्याचा भंग केला आहे. अपंग व्यक्तीसह त्यांच्या कुटुंबीयांची जाणीवपुर्वक रस्ता अडविणार्या मोहिते कुटुंबीयांवर दिव्यांग अधिनियम 2016 व साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी शेळके यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here