राष्ट्रपती पदक विजेते अमोल बागुल हे डॉक्टर संगीता तोडमल यांची अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक ओव्या आणि समाज या विषयावर मुलाखत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 28, 2021

राष्ट्रपती पदक विजेते अमोल बागुल हे डॉक्टर संगीता तोडमल यांची अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक ओव्या आणि समाज या विषयावर मुलाखत

 राष्ट्रपती पदक विजेते अमोल बागुल हे डॉक्टर संगीता तोडमल यांची अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक ओव्या आणि समाज या विषयावर मुलाखत


पा
चशे तीस वर्षांचा ऐतिहासिक आयुष्य असलेला अहमदनगर शहर आणि जिल्हा आपल्यासाठी इतिहासाचा दागिना व खजिना आहे. आपण ज्या जिल्ह्यात,शहरात, गावात राहतो, त्याचा आपल्यास थोडा का होईना इतिहास माहीती व ज्ञात असणे नितांत गरजेचे आहे. इतिहासाच्या पायावर आपल्याला वर्तमानातून भविष्याची वाटचाल करता येते. अनेक वर्षे नगरमध्ये राहून सुद्धा नगर बद्दल माहिती नसणारे या पिढीतील अनेक घटक आहेत. यामुळे पुढच्या पिढीचे नुकसान होणार आहे, पण इतिहास जतन संवर्धनातून आपल्याला पुढच्या पिढ्यांना काहीतरी चांगले देता येईल यानिमित्ताने नगरचा वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक अहमदनगर जिल्हा वाचनालय आणि नगर जल्लोष ग्रुप यांनी केले आहे. यावेळी राष्ट्रपती पदक विजेते अमोल बागुल हे डॉक्टर संगीता तोडमल यांची अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक ओव्या आणि समाज या विषयावर प्रकट मुलाखत घेणार आहेत. लहानपणापासूनच ग्रामीण भागात राहिल्यामुळे ग्रामीण संस्कृती बद्दलचे डॉक्टर संगीता तोडमल यांचे नाते नाते खूप जिव्हाळ्याचे आहे घरात एकत्रित कुटुंबात असताना घरामध्ये बाळाचं बारसं करताना पाळणे गायले जायचे ते लहानपणापासून त्या ऐकायचे त्यामुळे ते सर्व पाळणे लोकगीत भजन गवळणी भारुड हे माझे सर्व पाठ आहे. अमेरिकेत शिवाजीचा पाळणा शिवछत्रपती फाउंडेशन न्यूयॉर्क आयोजित कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री ठाणेदार सिनेट मेंबर मिशिगन तसेच न्यूयॉर्क राज्याचे सिनेटर केल्विन थामस  तसेच ए के विजयकृष्णन, दूत, सांस्कृतिक कार्य, भारतीय वाणिज्य दूतावास, न्यूयॉर्क हे हजर होते.
शिवछत्रपती फाउंडेशन न्यूयॉर्क आयोजित कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता या का कार्यक्रमाचे विशेष म्हणजे अमेरिकेत सर्वप्रथम शिवछत्रपतींचा पाळणा गायला गेला अमेरिकेत रास गरबा दांडिया भांगडा हे इतर राज्यातील कला सादरीकरण होत असताना आपला महाराष्ट्र सुद्धा कुठे कमी नाही हे डॉक्टर संगीता तोडमल इंगुळकर पर्यावरण अभ्यासक अमेरिकेतील केंटकी राज्यात राहतात  त्या अहमदनगर जिल्ह्यातील जेऊर येथील शंकरराव तोडमल यांची कन्या आणि सातारा जिल्ह्याची एकनाथ इंगुळकर सून आहेत सध्या अमेरिकेत त्या पर्यावरण अभ्यासक म्हणून काम करतात पण पर्यावरणाचा अभ्यास करताकरताच मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य जपण्याचा वारसा आपल्या मुलांनाही देतात तसेच द्या लग्नाची हळद दळताना ची जात्यावरची गाणी भारुड भजन गवळण संगीताचे प्रकार सुद्धा गातात त्यांचे मिस्टर निलेश इंगुळकर हे इंजिनिअर आहेत तसेच  हेउत्तम पखवाद वादक असून तेही मराठी संस्कृती जपण्याच्या कामे नेहमीच अग्रेसर असतात आपली मराठी भाषा टिकवून मराठी माती आणि मराठी नाती यांचा वसा पुढे टिकवला पाहिजे त्यासाठी त्या दिवाळी दसरा नवरात्र पाडवा संक्रांत हळदीकुंकू आषाढी एकादशी या विठ्ठल पूजा आणि आरती रंगपंचमी आशा विविध सन उत्सवांचे आयोजन करतात. तसेच हजर होते या का कार्यक्रमाचे विशेष म्हणजे अमेरिकेत सर्वप्रथम शिवछत्रपतींचा पाळणा गायला गेला अमेरिकेत रास गरबा दांडिया भांगडा हे इतर राज्यातील कला सादरीकरण होत असताना आपला महाराष्ट्र सुद्धा कुठे कमी नाही  आणि नगर जिल्हा तर मुळीच पाठीमागं नाही हे डॉक्टर संगीता तोडमल इंगुळकर पर्यावरण शास्त्रज्ञ यांनी दाखवून दिले आहे, त्या अमेरिकेतील केंटकी राज्यात राहतात सध्या मूळच्या त्या अहमदनगर जिल्ह्यातील जेऊर येथील शंकरराव तोडमल यांची कन्या आणि सातारा जिल्ह्याची एकनाथ इंगुळकर सून आहेत सध्या अमेरिकेत त्या पर्यावरण अभ्यासक म्हणून काम करतात पण पर्यावरणाचा अभ्यास करताकरताच मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य जपण्याचा वारसा आपल्या मुलांनाही देतात तसेच द्या लग्नाची हळद दळताना ची जात्यावरची गाणी भारुड भजन गवळण संगीताचे प्रकार सुद्धा गातात त्यांचे मिस्टर निलेश इंगुळकर हे इंजिनिअर आहेत तसेच  हेउत्तम पखवाद वादक असून तेही मराठी संस्कृती जपण्याच्या कामे नेहमीच अग्रेसर असतात आपली मराठी भाषा टिकवून मराठी माती आणि मराठी नाती यांचा वसा पुढे टिकवला पाहिजे त्यासाठी त्या दिवाळी दसरा नवरात्र पाडवा संक्रांत हळदीकुंकू आषाढी एकादशी या विठ्ठल पूजा आणि आरती रंगपंचमी आशा विविध सन उत्सवांचे आयोजन करतात.

No comments:

Post a Comment