आ. निलेश लंके यांच्या हस्ते भाजीपाला विक्री अ‍ॅपचे उद्घाटन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 27, 2021

आ. निलेश लंके यांच्या हस्ते भाजीपाला विक्री अ‍ॅपचे उद्घाटन.

 आ. निलेश लंके यांच्या हस्ते भाजीपाला विक्री अ‍ॅपचे उद्घाटन.

भाजीपालाही आता ऑनलाइन. नगर-पुणेतील नागरिकांसाठी उपक्रम.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना महामारीतील लॉकडाउन काळात भाजीपाला विक्री बंद असल्यामुळे भाजीपाला शेतातच खराब होऊ लागला. भाजीपाला हा रोज लागणारी जीवनावश्यक बाब असल्याचा विचार करून कर्जत येथील यशांजली भाजीपाला उत्पादक शेतकरी महिला बचत गटाने डिजिटल ऑनलाइन भाजीपाला विक्री अ‍ॅप तयार केले असुन लंके यांचे हस्ते या अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आल. नगर व पुणे शहरातील नागरिकांना या भाजीपाला विक्री अ‍ॅपद्वारे ऑनलाइन भाजीपाला पुरविण्यात येणार आहे.
याप्रसंगी आमदार निलेश लंके म्हणाले की ग्रामीण भागातील महिला या किती प्रगतीपथावर आहेत याचे उदाहरण म्हणजे यशांजली भाजीपाला उत्पादक शेतकरी महिला गटच्या माध्यमातून दिसत आहे. आत्ताची परिस्थिती बघता ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन ग्रामीण भागातील माल खरेदी करून शहरात विक्री करण्याचा हा जो निर्णय घेतला आहे हा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा आहे.शहरी भागातील नागरिकांना घरपोच भाजीपाला मिळणार आहे. व याची प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील महिला ऑनलाइन डिजिटल मार्केटिंग करण्यास पुढे येणार असल्याची भावना लंके यांनी व्यक्त केली.
यावेळी गौरी होगले, मोनिका बरबडे, नीता गोंजारे, छाया नेटके, राहुल (मुन्ना) वैद्य, गणेश भालसिंग, सुरेश गोंजारे, शिवाजी नेटके, रेवन होगले, केतन खिची, मनीष तेवर आदी उपस्थित होते.

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या जागतिक संकटामुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन झाला आहे त्यामुळे बाजार समित्या बंद झालेल्या शेतकर्‍यांच्या भाजीपाला पिके शेतातच खराब झाली. त्यामुळे आमच्या सारख्या गरीब व लहान शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाला फळे ही तर दररोज लागणारी गरज आहे. याशिवाय लोक जगू शकत नाहीत म्हणून शासनाने भाजीपाला व फळे याची घरपोच सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. आमच्या शेतातील उत्कृष्ट व दर्जेदार शेतमाल हा योग्य व कमीत कमी किंमतीत उपभोक्त्या पर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून आम्ही गावातील महिलांनी एकत्र येऊन नगर व पुणे शहरात घरपोच भाजीपाला व फळे देण्याची योजना तयार केली. आमच्या गावातील महिला एकत्र येऊन यशांजली भाजीपाला उत्पादक शेतकरी गट या शेतकरी गटामार्फत आपल्या शेतातील चांगल्या उत्कृष्ट दर्जाच्या भाजीपाला व फळे नगर शहरातील व पुणे शहरातील उपभोक्त्या पर्यंत पोहोचवण्यासाठी भाजीबाजार मोबाईल प तयार करण्यात आले या अ‍ॅप वरून भाजी घरपोच मागवता येणार व लहरूळलरूररी.लेा या अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी किंवा आमच्या कस्टमर केअर नंबर 9579095303 वर मिस कॉल केला तरी लिंक भेटणार आहे. - गौरी होगले, यशांजली भाजीपाला उत्पादक महिला बचत गट.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here