रामवाडी अतिक्रमण हटाव मोहिमेस एक दिवसाची स्थगिती. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 27, 2021

रामवाडी अतिक्रमण हटाव मोहिमेस एक दिवसाची स्थगिती.

 रामवाडी अतिक्रमण हटाव मोहिमेस एक दिवसाची स्थगिती.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः तारकपूर ते रामवाडी पेट्रोल पंपा पर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी आज मनपा प्रशासनाने सुरुवात केल्यानंतर अतिक्रमण दुकानदारांनी दुकानाच्या आतील मालक काढण्यास वेळ मागितल्यामुळे या मोहिमेस तात्पुरती स्थगिती दिली. 1 दिवसांच्या आत दुकानदारांनी दुकाने खाली न केल्यास दुकाने जमीनदोस्त करण्याचा इशारा अतिक्रमण विरोधी पथकाचे सुरेश इथापे यांनी दिला आहे.
तारकपूर रस्ता ते रामवाडी पेट्रोल पंप पर्यंत चा रस्ता हा रस्ता नवीन डीपी रस्ता म्हणून मनपाने घोषित केला आहे या रस्त्याच्या कामाला आता गती देण्यात येत आहे. परंतु रस्त्याचे काम करत असताना रस्त्याच्या मध्यभागी रामवाडी येथे मंजूर असलेल्या रस्त्यावर काहींनी अनाधिकृतपणे दुकाने थाटली आहे या अनाधिकृत दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण काढण्यास आज सकाळ पासून मोठ्या पोलीस बंदोबस्त मध्ये कारवाईस सुरुवात करण्यात आली होती
सध्या कोरोनाचे सावट असल्यामुळे दुकानदारांची दुकाने की बंद होती दुकानदारांचा दुकानातील मोबाईल आत मध्ये पडून होता दुकानातील माल काढण्यास आम्हाला मुभा द्यावी व त्यानंतर आपण आपली कारवाई करावी अशी विनंती दुकानदारांनी केली व त्यानंतर कारवाईला पूर्वविराम देण्यात आला अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी एक दिवसांची मुदत दुकानदराना देण्यात आली.

No comments:

Post a Comment