पाच महिन्यांपासून कोविड योद्धे मानधनापासून वंचित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

पाच महिन्यांपासून कोविड योद्धे मानधनापासून वंचित

 पाच महिन्यांपासून कोविड योद्धे मानधनापासून वंचित

अहोरात्र सेवा करूनदेखील मानधन मिळत नसल्याने गृहरक्षक दलातील जवान हवालदिल

पोलीस ठाण्यात ड्युटी साठी हजर झाल्या नंतर कर्तव्य बजावत असताना दैनंदिन जीवनातील प्रेटोल, आहार भत्ता, असा खर्च होत असतो परिस्थिती प्रमाणे खर्च करून जवान  आपले कर्तव्य पार पाडतात आहे तो पैसा खर्च होतो आणि मानधन वेळेत जमा होत नाही जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यांनी जातीने लक्ष केंद्रित करावे हीच अपेक्षा हे जवान करीत आहे.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः गृहरक्षक दलांतील जवानांचें  सात महिन्याचे कोविड काळात पोलीस मदत बंदोबस्त चें मानधन थकले असून अहोरात्र पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे जवान मानधन वेळेत मिळत नसल्याने हवालदिल झाले आहे जानेवारी महिन्या पासून खात्यांवर एक दमडी देखील जमा झालेली नाही त्यातच सध्या लॉक डाऊन कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न होमगार्ड जवानांच्या समोर निर्माण झाला आहे

फ्रंट लाईन वर्कर म्हणून सध्या हे जवान कोविड योद्धे म्हणून आपले कर्तव्य बजावत आहे मात्र पाच महिन्यापासून कोविड योद्धे मानधना पासून वंचीत असल्याने दबक्या आवाजात नाराजीचा सुर पहावयास मिळत आहे
बंदोबस्त साठी  तैनात करण्यात आलेल्या जवानांचा बंदोबस्त संपताच एका महिन्याचे प्रमाण पत्र स्थानिक पोलीस ठाण्याला देण्याचे बंधनकारक आहे मात्र महिना उलटून देखील काही पोलीस ठाण्यातील कंपनी चालक हलगर्जीपणा करतात यामुळे जवानांच्या खात्यात मानधन वेळेत जमा होत नाही
करोना सारख्या महामारीत आज सर्वात मोठी मदत पोलीस  यंत्रणेला असेल तर ती फक्त गृह रक्षक दलाची आहे आज अहमदनगर जिल्ह्यात एकूण 500 च्या आसपास महिला व पुरुष जवान कर्तव्य बजावत आहे अप्परपोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जवानांच्या मानधना बाबत जातीने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी होमगार्ड जवान करत आहे .
कोरोना काळात बारा तास ड्युटी करून देखील वेळेत मानधन जमा होत नसल्याने कुटुंबाची चिंता वाटते वरिष्ठ अधिकारी यांनी जातीने लक्ष केंद्रित करावे हिच अपेक्षा आहेकोरोना काळातील एक महिन्यासाठी पोलीस मदत बंदोबस्त   सध्या चालू आहे या बंदोबस्त साठी तैनात असलेल्या सर्व जवानांचे मानधना साठी  ग्रॅण्ड  अजून कशी उपलब्ध नाही आधिकारी यांचे दुर्लक्ष का असा प्रश्न निर्माण होत आहे ?

No comments:

Post a Comment