सारसनगर परिसरात कोविड लसीकरण केंद्र सुरु करावे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

सारसनगर परिसरात कोविड लसीकरण केंद्र सुरु करावे

 सारसनगर परिसरात कोविड लसीकरण केंद्र सुरु करावे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून कोविड लसीकरण सुरु असून सर्वच केंद्रांवर लसीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी महानगरपालिकेने बोल्हेगाव, केडगाव व इतर ठिकाणी नवीन लसीकरण केंद्र सुरु केले आहे. याच अनुशंगाने सारसनगर परिसरातही स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु करावे अशी मागणी या प्रभागातील नगरसेवकांनी केली आहे. याबाबत मनपा आयुक्तांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, शितलताई जगताप, मीनाताई चोपडा, माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सारसनगर परिसर मोठ्या लोकवस्तीचा भाग आहे. शांतीनगर, कपिलेश्वर नगर, चिपाडे मळा, ओम कॉलनी, संदीपनगर, भवानीनगर, महावीर पार्क, महावीर कॉलनी, भगवानबाबा नगर या भागात मोठी लोकवस्ती आहे. या परिसरातील नागरिक सातत्याने स्वतंत्र लसीकरण केंद्रासाठी आग्रही आहेत. या परिसरातील नागरिकांना सध्या लसीकरणासाठी लांब अंतरावर जावे लागते. लॉकडाऊनमुळे संचारबंदी लागू आहे, अशा परिस्थितीत दूर अंतरावर जाणे जिकीरीचे होते. याशिवाय वयोवृध्द, ज्येष्ठ नागरिकांनाही दूर अंतरावरील लसीकरण केंद्रावर नेताना अडचणी येतात. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी सारसनगर परिसरात लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी यापूर्वीही आम्ही वेळोवेळी केलेली आहे. मनपाने शहरातील इतर भागात ज्या पध्दतीने लसीकरण केंद्र सुरु केले त्याचपध्दतीने सारसनगर परिसरातही लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment