बिल्डींग मटेरिअच्या सामानाची चोरी करणारे चोरटे जेरबंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 28, 2021

बिल्डींग मटेरिअच्या सामानाची चोरी करणारे चोरटे जेरबंद

 बिल्डींग मटेरिअच्या सामानाची चोरी करणारे चोरटे जेरबंद

तोफखाना पोलीसांकडुन 24 तासाच्या आत आरोपींना बेड्या


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सावेडीत बिल्डींग मटेरिअच्या सामानचे दुकानात चोरी करणार्‍या आरोपीना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून लाखों किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपीना  तोफखाना पोलीसांकडुन 24 तासाच्या आत अटक करण्यात यश आले आहे. संदीप उर्फ संजु रामचंद्र गायकवाड, मंगेश उर्फ अंकल संजु पवार, शर्मा हुरमास काळे, (सर्व रा नोबेल हॉस्पिटल मागे, प्रेमदान हाडको, सावेडी), राम सुदाम सौदागर (रा.वैदुवाडी भिस्तबाग चौक) अशी जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहे. तर त्याच्या सोबत चोरी करणारे साथीदार परम्या गायकवाड, लक्ष्मण कुर्‍हाडे, आकश कुर्‍हाडे याचा पोलीस कासून शोध घेत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली महिती अशी की, अज्ञात चोरट्यांनी सिरॅमिक्स बिल्डींग मटेरिअल सप्लायर्स दुकान, पंचशिल हॉटेल, सावेडी अहमदनगर येथुन बिल्डींग मटेरिअल सामानाची चोरी करून दुकाने फोडले होते. या बाबत घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहमदनगर उपविभागीय अधिकारी विशाल दुमे, पोलीस निरीक्षक एस.पी गायकवाड, यांचे मार्गदर्शनाखाली सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे, पोहेकाँ शकील सय्यद, पोना. अविनाश वाकचौरे, वसीमखान पठाण, अहमद इनामदार, पोकॉ. धिरज खंडागळे, सचिन जगताप, गोमसाळे, आंधळे यांनी या गुन्हचा तपास केला. या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाळी की सदर गुन्ह्यातील आरोपी हे प्रेमदान हाडको, झोपडपटटी, अहमदनगर येथे आले असल्याची माहीती मिळाल्याने सदर भागात वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावुन आरोपीना जेरबंद केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here