कोरोना रोखण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे आवश्यक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 28, 2021

कोरोना रोखण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे आवश्यक

 कोरोना रोखण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे आवश्यक

विशाल वालकर ः जुना कापड बाजार येथे लसीकरण केंद्र सुरू


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आरोग्य केंद्रावरच लसीकरण असल्याने वृद्ध, महिला यांची मोठी अडचण होत असत. शिवाय ऑनलाईन रजिस्ट्रेशन, पहाटेच जाऊन नंबर लावणे, लस येईल की नाही, कोव्हॅक्सिन की कोशिल्ड अशा विविध प्रश्न निर्माण होत आहेत.  त्यामुळे  आरोग्य कर्मचार्यांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत. परंतु लसीकरण केंद्राचे विकेंद्रीकरण केल्याने सुसूत्रता येऊन परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे. जुना कापड बाजार भागात लसीकरण सुरु केल्याने एकाच केंद्रावर होणारी गर्दी कमी होईल. पर्यायाने सोशल डिस्टसिंगचे पालन होऊन लसीकरणातही अडचणी येणार नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे असल्याने प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवगर्जना प्रतिष्ठानचे विशाल वालकर यांनी केले.
अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभाग व शिवगर्जना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जुना कापड बाजार येथील श्री महाप्रभुजी मार्ग येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. याप्रसंगी विशाल वालकर, बुथ हॉस्पिटलचे प्रमुख देवदान कळकुंबे, मनोज गुंदेचा, नारायण गुजराती, अजय गांधी, दर्शन शहा, भरत देवी, मयूर पारीक, मदन गुजराती, वैभव शहा, दिनेश चोपडा, विशाल वालकर, संभव काथेड, प्रणय चोरडिया, भूमकर दादासाहेब, गणेश दहिहंडे उपस्थित होते. या प्रसंगी देवदान कळकुंभे म्हणाले, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. मागील दीड वर्षांपासून सुरु असलेल्या या महामारीवर लस निघाल्याने आता कोरोना आटोक्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनी लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. मनपाच्यावतीने  विविध भागात  लसीकरण केंद्र सुरु करुन नागरिकांची सोय करत आहेत, त्यासाठी परिसरातील सामाजिक संस्था, प्रतिष्ठानचा पुढाकार हा महत्वाचा ठरत असल्याने लवकरच सर्वांचे लसीकरण होईल, असे विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.या लसीकरण केंद्रासाठी विशाल वालकर यांनी अथक परिश्रम घेतले तसेच नागर गुजराती समाज यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment