शंकर महाराजांच्या 74व्या समाधी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 21, 2021

शंकर महाराजांच्या 74व्या समाधी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

 शंकर महाराजांच्या 74व्या समाधी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः श्री सद्गुरु शंकर महाराजांचा 74 व्या समाधी सोहळ्यानिमित्ताने गिरीनार भजन संध्या सत्संग सेवा मंडळ ट्रस्ट नगर शहर यांच्यावतीने  यांचे गेल्या 31  दिवसापासून अन्नछत्र  चालू  केले आहे.
यावेळेस आज  या सोहळ्या निमित्त युवा मित्रपरिवाराने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्या ठिकाणी आज शिवसेना शहर प्रमुख दिलीप (दादा) सातपुते यांनी भेट दिली.
त्यानी गोरगरिबांना घरपोच अन्नछत्र  चालू केला आहे  कारण ज्या गरजू जनतेला दोन वेळेस अन्न  देखील मिळत नाही जी जनता  ह्या महामारीच्या  जीवनात  आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळू शकत नाही  या उपक्रमामुळे त्याना मोठा आधार मिळाला आहे. त्यावेळेस  अन्नछत्रसाठी  या सर्वांचे व अजून सहकारी मित्राचे मोलाचे योगदान आहे खूप छान उपक्रम चालू आहे  या सेवा मंडळाचे व सर्व सहकारी बांधवांचे  मनापासून आभार मानतो व शुभेच्छा देतो व यापुढे या कार्यासाठी काही मदत लागल्यास मी नक्की मदत करल असे आश्वासन दिले.
या वेळेस जंजाळे परिवार, विठ्ठल (महराज) कोतकर, शिवाजी अनभुले, ओंकार सातपुते, सनीभैय्या जाधव, वैभव सलगिरे, शुभम कोमकुल, केदार रासकर, केशव मोकाटे, वैभव लंगोट, आशुतोष शर्मा, पै.शिवा भागानगरे,अक्षय सप्रे, अक्षय तोडकर, प्रणव दानी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here