‘दारु’साठी व्याजाने पैसे, काढावे लागतील - भुतारे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 28, 2021

‘दारु’साठी व्याजाने पैसे, काढावे लागतील - भुतारे.

 ‘दारु’साठी व्याजाने पैसे, काढावे लागतील - भुतारे.

मनसेच्या वतीने आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना महामारी च्या काळामध्ये सरकारने लॉकडाऊन जाहीर केले असताना सर्व व्यापार ठप्प करण्यात आले बाजार पेठ दुकाने सर्व बंद करण्यात आले व महाविकास आघाडी सरकारच्या अशा जुलमी निर्णयामुळे लोकांकडे दारू घ्यायला सुद्धा पैसे राहिले नाहीत. म्हणजे दारू प्यायची म्हटलं तरी लोकांना आता व्याजाने पैसे घ्यावे लागत आहे अशी परिस्थिती सरकारने सर्वसामान्यांवर आणून ठेवली आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना रोज आवश्यक असणारी किराणा दुकाने बंद केली पण दारू पार्सल द्वारे विक्रीची परवानगी दिली याचा निषेध म्हणून मनसेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक घालण्यात आला.
सरकारने फक्त दारू विक्री चालू ठेवण्याचे आदेश दिले कपड्याच्या दुकान, किराना, मोबाईलच्या दुकान, ऑटोमोबाईल या सर्व क्षेत्रांमध्ये काम करणारे कामगार आज दोन ते तीन महिने झाले त्यांना पगार नाही त्यांना कोणतीही शासनाची मदत नाही. किराणामाल चोरून विकायचे व दारू खुलेआम विक्री करायची सर्वसामान्य दुकानदाराची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे सरकारने दारूविक्री पार्सल सुविधा चालू करण्याचे आदेश दिलेले आहे.
शहरांमध्ये 10. हाजार रिक्षावाले आहे त्यांना फक्त 500 रिक्षावाल्यांना सरकारने मदत केलेली आहे व बँक फायनान्स कंपनी यांच्या हप्ते भरायला सुद्धा सर्वसामान्य नागरिक व्यापारी कामगार यांच्याकडे पैसे राहिलेले नाहीं आणि कुठल्या प्रकारचे बँक वाले थांबत नाही सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून  योग्य नियोजन करून बाजारपेठ लवकरात लवकर चालू करण्याचे आदेश देण्यात यावेत सरकारचा मनसेच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला व येणार्‍या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन मनसेच्या वतीने रास्तारोको आंदोलन केला जाईल असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला.
याप्रसंगी जिल्हा सचिव नितीन भुतारे समवेत उपशहर अध्यक्ष गणेश शिंदे, संकेत व्यवहारे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment