अहमदनगरच्या 531व्या स्थापना दिनानिमित्त जगभरातील नगरकरांची व्याख्याने - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 27, 2021

अहमदनगरच्या 531व्या स्थापना दिनानिमित्त जगभरातील नगरकरांची व्याख्याने

 अहमदनगरच्या 531व्या स्थापना दिनानिमित्त जगभरातील नगरकरांची व्याख्याने

जागतिक पातळीवरील ‘आपलं नगर गौरव’कडून ऑनलाइन व्याख्यानमाला


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः ऐतिहासिक अहमदनगरच्या 531व्या स्थापना दिनानिमित्त ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदनगर व नगर जल्लोष परिवार ट्रस्ट यांच्या वतीने जागतिक पातळीवरील ‘आपलं नगर गौरव’कडून ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी कळविले आहे.
प्रायोगिक तत्त्वावर या पहिल्याच उपक्रमात जागतिक पातळीवर ठसा उमटविणारे विविध क्षेत्रातील नगरकर मान्यवर ऐतिहासिक मेजवानी प्रस्तुत करतील. नगर जल्लोष ट्रस्ट परिवाराचे अध्यक्ष सागर बोगा व अजय म्याना हे तांत्रिक सहकार्य करतील. संकल्पना, समन्वमक व मुलाखतकार राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक डॉ. अमोल बागूल काम पाहतील.
गुरुवार, दि. 27 मे रोजी सकाळी 11 वाजता इतिहास अभ्यासक, संशोधक तथा ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचे ऐतिहासिक अहमदनगरचे वास्तुवैभव या विषयावर, सायं. 6.30 वा. पॅरिस (फ्रान्स) येथील उद्योजक तथा इतिहास संशोधक व मूळचे नगरकर असलेले डॉ. शशी धर्माधिकारी यांचे ऐतिहासिक अहमदनगर बद्दल जागतिक पातळीवरील विविध इतिहास अभ्यासकांचे इतिहास समीक्षण या विषयावर, शुक्रवार, दि. 28 मे रोजी सकाळी 11 वाजता इतिहास अभ्यासक व संशोधक प्रा. नवनाथ वाव्हळ यांचे अहमदनगरच्या निजामशाहीतील बहुउद्देशीय वास्तुकला विषयीचा लेखाजोखा या विषयावर व्याख्यान होईल, तसे सायंकाळी 6.30 वाजता ग्लोबल नगरी फाउंडेशन आणि आपलं अहमदनगर या विषयावर चर्चासत्रात ग्लोबल नागरी फाउंडेशन, अमेरिका बोर्ड मेंबर्स (अमेरिका)चे प्रेसिडेंट किशोर गोरे, सेक्रेटरी रोहित काळे, ट्रेझरर अविनाश मेहेत्रे, व्हा. प्रेसिडेंट लताताई शिंदे व काजल बोर्डवेकर हे सहभागी होतील.
शनिवार, दि. 29 रोजी सायं. 6.30 वाजता पर्यावरण तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. संगीता तोडमल (अमेरिका) यांचे अहमदनगरच्या इतिहासावरील स्वलिखित ओव्या व इतिहास गीते सादरीकरण होईल. गुगल मीट, फेसबुक लाईव्ह, यु ट्युब, तसेच विविध समाजमाध्यमांच्या व्यासपीठावर या मुलाखती प्रसारित केल्या जातील. ज्यांना या मुलाखतींचा आनंद घ्यायचा आहे, त्यांनी खालील लिंकचा वापर करून मुलाखती पाहाव्यात, तसेच अधिक माहितीसाठी 9595 54 5555 व 9860612045 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

No comments:

Post a Comment