शेतरस्त्याचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झालेल्या शेतकर्‍यांचा प्रश्न तातडीने सोडवु..: तहसीलदार देवरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 27, 2021

शेतरस्त्याचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झालेल्या शेतकर्‍यांचा प्रश्न तातडीने सोडवु..: तहसीलदार देवरे

 शेतरस्त्याचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झालेल्या शेतकर्‍यांचा प्रश्न तातडीने सोडवु..: तहसीलदार देवरे

शिव पाणंद शेतरस्ते नवनिर्माणच्या शिष्टमंडळाने घेतली तहसीलदारांची भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  पारनेर तालुक्यात गेल्या अनेक अनेक वर्षांपासुन शेतकर्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा शिवपाणंद शेतरस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी पारनेर तालुक्यात सुरु केलेल्या शेतरस्ता चळवळीला अनेक संकटांना तोंड देत शेतकर्यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातुन प्रशासणाचे लक्ष वेधण्याचे काम शेतकर्यांनी केले वेळोवेळी तहसीलदारांची पारनेरमध्ये होणारी बदली हे चळवळीतुन उभ्या झालेल्या शिवपांणद शेतरस्ते नवनिर्माण कृती समितीसमोर आव्हानच होते त्यातच शेतकर्यांनी जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांच्या आवाज दो आंदोलनाचा लढा उभारणार्या पत्रकाचे राळेगणसिद्धित अनावरण केले व आण्णांणीही लढ्याला पांठिबा दर्शवला.
त्यातच समितीने पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी, भुमि अभिलेख, महसुल प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी सप्तपदी अभियात शिव पाणंद शेतरस्त्यांच्या कामाच्या पुर्ततेसाठी जनजागृती चालु केली याला पारनेरच्या तहसीलरांसमवेत शेतकर्यांनी बैठक घेवुन प्रशाणासोबत राहुन काम करण्याचा समितीने निर्णय घेतला त्यातच याकार्याला व्यापक करण्यासाठी पद्मश्री पोपटराव पवारांचे मार्गदर्शन कार्यक्रम हिवरे बाजार येथे ठेवत शेतकर्यांनी आधार फांउडेशनचे अनावरण हिवरे बाजार येथे करण्यात आले त्यातच कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाउन झाल्यामुळे शेतरस्त्यांच्या प्रश्नावर काम करणे मोठे कठीण होवुन बसले त्यातच  पारनेर व श्रीगोंदा हद्दीतील शेतरस्ता पारनेरच्या तहसीलदांरांनी पुर्ण केला याची माहीती शेतकर्यांना समजल्यामुळे अडचणीत असणार्या शेतकर्यांनी फोनवर चर्चा केली व शेवटी तहसीलदारांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी शिष्टमंडळाने तहसीलदारांचे कोरोनात केलेल्या कामाबद्द धन्यवाद व्यक्त केले व त्यातच कडुस व श्रीगोंदा येथील रस्ता सोडवल्याबद्दल आभार मानले त्यावेळी पारनेच्या तहसीलदारांकडुन कोरोना सदृश्य परिस्थिती नियंत्रणात येताच तातडीने प्रथम प्राधान्याने शेतरस्त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन  आधार फांउडेशनचे शरद पवळे,संजय कनिच्छे,विजय मल्लाव यांना भेटीरम्यान देण्यात आले तरी शेतकर्यांनी आपापसात कुठलाही संघर्ष न करता अशा परिस्थितीत प्रशासणासोबत राहुन आपल्याला न्याय मिळवणे गरजेचे आहे अनेक वर्ष,अनेक पिढ्या संघर्ष करताना आपण पाहीलेल्या आहेत त्यामुळे परिस्थितीनुरुप आपण कार्य करत आहोत नक्कीच आपल्या सर्वांना न्याय याठीकाणी मिळणार असे आधार फांउडेशनचे संस्थापक अध्यक्ष शरद पवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here