करोना परिस्थिती हाताळणीत... ठाकरे देशातील ‘बेस्ट सीएम’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

करोना परिस्थिती हाताळणीत... ठाकरे देशातील ‘बेस्ट सीएम’

 करोना परिस्थिती हाताळणीत... ठाकरे देशातील ‘बेस्ट सीएम’


मुंबई ः
एका ज्येष्ठ पत्रकाराने काही दिवसांपूर्वी देशातील करोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्यमंत्री कोण होते हे जाणून घेण्यासाठी घेतलेल्या ट्विटरवरील जनमत चाचणीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक म्हणजेच 62 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत. सध्या सोशल नेटवर्किंगवर शिवसेना समर्थकांकडून या पोलचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल केले जात आहेत.ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून करोनाच्या कालावधीमध्ये सर्वात चांगल्या पद्धतीने काम करणारे देशातील मुख्यमंत्री कोण असा ट्विटर पोल घेतला होता. कोणत्या मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या दुसर्‍या लाटेच्या कालावधीमध्ये सर्वोत्तम नियोजन केलं?, असा प्रश्न विचारत चावला यांनी दोन पोल घेतले होते. एका पोलला चारच पर्याय देता येत असल्याने त्यांनी दोन पोल घेत आठ मुख्यमंत्र्यांचे पर्याय दिले होते.पहिल्या पोलमध्ये दोन लाख 67 हजार 248 जणांनी आपलं मत नोंदवलं. यापैकी 62.5 टक्के मत ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळाली. म्हणजेच दोन लाख 67 हजार 248 जणांपैकी एक लाख 67 हजार 30 मतं उद्धव यांना मिळाली. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 31.6 टक्के तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 4.6 टक्के आणि केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना 1.3 टक्के मत मिळाली. म्हणजेच योगी यांना एकूण 84 हजार 450 मतं मिळाली. केजरीवाल यांना 12 हजार 293 तर विजयन यांना 3 हजार 474 मतं मिळाली.

No comments:

Post a Comment