सराईत गुन्हेगार पठारे तोफखाना पोलिसांकडून पुण्यात जेरबंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

सराईत गुन्हेगार पठारे तोफखाना पोलिसांकडून पुण्यात जेरबंद

 सराईत गुन्हेगार पठारे तोफखाना पोलिसांकडून पुण्यात जेरबंद

अहमदनगर ः अहमदनगर शहरात दहशत निर्माण करून एकावर चाकू हल्ला करणारा सराईत गुन्हेगार विजय राजू पठारे व त्याचा साथीदार करण पाचारणे यांना तोफखाना पोलिसांनी पुण्यातून अटक केली. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे व त्यांच्या सोबतच्या पाच कर्मचार्यांनी रविवारी रात्री ही कामगिरी केली. तोफखान्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी ही माहिती दिली.19 मे रोजी दिनेश पंडीत (रा. सिद्धार्थनगर) व यापूर्वी बालिकाश्रम रोडवरील दोन दुकानात दरोडा टाकून दहशत निर्माण करणारा विजय पठारे पसार होता. यापूर्वी त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. परंतु पठारे पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर उपनिरीक्षक मेढे व त्यांच्या पथकाने पठारे व त्याच्या एका साथीदाराला पुण्यात बेड्या ठोकल्या.

No comments:

Post a Comment