उप जिल्हा रुग्णालयातील डॉक्टराचा मनमानी कारभार चालु देणार नाही - भास्कर भैलुमे यांचा प्रशासनाला इशारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 28, 2021

उप जिल्हा रुग्णालयातील डॉक्टराचा मनमानी कारभार चालु देणार नाही - भास्कर भैलुमे यांचा प्रशासनाला इशारा

 उप जिल्हा रुग्णालयातील डॉक्टराचा  मनमानी कारभार चालु देणार नाही - भास्कर भैलुमे यांचा प्रशासनाला इशारानगरी दवंडी

कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत मधील प्रामाणिक  काम करणाऱ्या अधिकाऱ्याना व लोकप्रतिनिधीना बदनाम करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जाणुन बुजुन उलट सुलट कामे करत लसीकरणा मध्येही गोंधळ करत आहेत का असा अत्यंत गंभीर प्रश्न सामाजिक कार्यकर्ते भास्कर भैलुमे यांनी उपस्थित केला आहे. 

               कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरणा बाबतचा गैरप्रकार पत्रकार आशिष बोरा यांनी जनते समोर आणल्यानंतर याबाबत उपजिल्हा रुग्णालयाबाबत अत्यंत गंभीर प्रतिक्रिया उमटत असून यामध्ये जनतेचा मोठा रोष पहावयास मिळत आहे. 

               कोरोनाच्या काळात प्रशासनाच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, सर्वसामान्य नागरिक पुढे येत असताना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात मात्र डॉ बांगर यांच्या मनमानी कारभारामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे. सर्व सामान्य नागरिकांना ञास देण्याचे काम जर कोणताही अधिकारी करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवुन देण्याचे काम केले जाईल याची सर्वच विभागातील अधिकारी वर्गाने नोंद घेण्याचे अवाहन सामाजिक कार्यकर्ते भास्कर भैलुमे यांनी केले आहे. डॉ बांगर सारखे अधिकारी जर  लोकशाही प्रणालीचे आपण रक्षक आहोत हे विसरले असतील तर त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागेल. कर्जत तालुक्यात पत्रकार आशिष बोरा यांचे कोरोना काळातील काम सर्व नागरिकां सह प्रशासनाला ही माहीत आहे तरी ही ते टोकन घेऊन लस मिळण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांनाच सर्व नियम पाळून ही लस मिळत नसेल तर सर्व सामान्य नागरिकांचे हे प्रशासन किती हाल करत असतील त्यामुळे  कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील  पेशंटला व त्याच्या बरोबर आलेल्या नातेवाईकांशी डॉ सोनाली बांगर या अत्यंत उद्धटपणे बोलतात त्याची खाते निहाय चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भास्कर भैलुमे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here