खा. विखे यांच्या प्रयत्नातून 60 घरांचा प्रकल्प पूर्ण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 27, 2021

खा. विखे यांच्या प्रयत्नातून 60 घरांचा प्रकल्प पूर्ण

 खा. विखे यांच्या प्रयत्नातून 60 घरांचा प्रकल्प पूर्ण

एकलव्य समाजासाठी महाराष्ट्रातील पहिलीच घरकुल योजना


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केंद्र सरकारच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या माध्यमातून खा. सुजय विखे यांनी खारे कर्जुने येथे 20 गुंठे जागेत 60 घरांचा प्रकल्प राबवून तो पूर्णही केला. या पूर्ण झालेल्या प्रकल्पाची पाहणी नुकतीच केली. या प्रसंगी डॉ.सुजय विखे पा. पुढे म्हणाले की, एकलव्य समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लवकरच यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी डीजीटल अंगणवाडी सुरू करण्यात येईल. पाण्याची टाकी, धोबी घाट, सभा मंडप, आदीसह योजना पुढील काळात राबवू असे ते म्हणाले.
एकलव्य समाज हा उदर निर्वाह करण्यासाठी खारे कर्जुने येथील के के रेंज परिसरामध्ये 40 ते 50 वर्षापासून वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे नव्हते. पहिल्यांदा त्यांना रेशनकार्ड, जातीचे दाखले, आधार कार्ड मिळून दिले. त्यानंतर एकलव्य कुटुंबाला स्वत:चे हक्काचे घर असावे या उद्देशाने खारे कर्जुने येथे 20 गुंठ्ठे जागा खरेदी केली या ठिकाणी मा.केंद्र सरकारच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून 60 घरांचा प्रकल्प राबविण्यात आला. उर्वरित 15 घरांचा प्रकल्पही लवकरच मार्गी लावू असेही ते म्हणाले.
या कामासाठी मा.श्री.कैलास लांडे, खरेदी विक्री संघाचे संचालक मा.श्री.अंबादास शेळके, माजी सरपंच मा.श्री.सबाजी पानसंबळ यांनी या कामासाठी माझ्याकडे पाठपुरावा केल्यामुळे या घरकुल योजनेला यश मिळाले आहे. मा.केंद्र सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटका पर्यत घेवून जाण्यासाठी मी कटीबध्द आहे. कोरोनाच्या संकट काळामध्ये केंद्र सरकारने महत्वाची भुमिका पार पाडली असल्याचे ही विखे म्हणाले.
श्री.कैलास लांडे म्हणाले की, एकलव्यासाठी राबविण्यात येणा-या घरकुल योजनेमध्ये विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या परंतु मा.खा.डॉ.श्री.सुजय विखे यांनी मार्ग काढीत हा प्रकल्प राबविला त्यामुळे 60 कुटुंबाला स्वत:चे हक्काचे घर मिळाले पुढील काळात 15 कुटुंबानाही याच ठिकाणी घर मिळणार आहे सनफार्मा व क्राम्प्टन कंपनीने या ठिकाणी विविध कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या ठिकाणी डांबरीकरणाचे रस्ते झाले. याचबरोबर पर्यावरणासाठी मोठया प्रमाणात वृक्षारोपन करण्यात आले. सौर पथदिवे बसविण्यात आले. गावच्या विकासासाठी आम्ही खा.डॉ.श्री.सुजय विखे पा. यांच्या कडून निधी उपलब्ध करून घेवू. ही योजना पूर्ण करण्यासाठी विविध स्वच्छ भारत अभियान, नरेगा शौचोलय, शबरी आवास योजनेचा निधी उपलब्ध झाला असल्यामुळे हा प्रकल्प यशस्वी रित्या राबविण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
यावेळी जिल्हापरिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री.जगन्नाथ भोर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.सचिन घाडगे, खरेदी विक्री संघाचे संचालक श्री.अंबादास शेळके, श्री.कैलास लांडे, माजी सरपंच श्री.सबाजी पानसंबळ, श्री.अजित तांबे, श्री.अमोल निमसे, श्री.रसिद सय्यद, श्री.लहानू बोरूडे, श्री. अनिल निमसे, श्री.रामेश्वर निमसे, ग्रामसेविका श्रीमती प्रियंका भोर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment