गावठी, देशीदारू व ताडी जप्त. भिंगार कॅम्प पोलिसांकडून आरोपी जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 27, 2021

गावठी, देशीदारू व ताडी जप्त. भिंगार कॅम्प पोलिसांकडून आरोपी जेरबंद.

 गावठी, देशीदारू व ताडी जप्त. भिंगार कॅम्प पोलिसांकडून आरोपी जेरबंद.


अहमदनगर ः भाऊ उर्फ जय विठ्ठल भिंगारदिवे वय 45 रा.घासगल्ली भिंगार ता.नगर जि.अहमदनगर यास अवैद्य गावठी, हातभट्टी, देशी दारू व ताडी मुद्देमाल कब्जात बाळगताना व विक्री करताना पकडले असून तसा कॅम्प पो.स्टे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॅम्प पो.स्टे भिंगार चे प्रभारी अधिकारी सपोनि शिशिर कुमार देशमुख यांना माहिती मिळाली की घास गल्ली भिंगार अहमदनगर भाऊ उर्फ जय विठ्ठल भिंगार दिवे वय 45 रा.घासगल्ली भिंगार ता.नगर जि.अहमदनगर हा विनापरवाना बेकायदा गावठी, हातभट्टी, दारूची तसेच देशी दारू व ताडी ची विक्री करत आहे या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्याचे कब्जात 30,000 रु. किमतीची 300 लिटर गावठी हातभट्टी दारू तसेच 2834 रु. किमतीची देशी दारू बॉबी संत्रा कंपनीच्या 109 बाटल्या व 3,000 रु. किमतीची ताडीचे 200 फुगे प्लास्टिक पिशवीत असा एकूण 35834 कि चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे, यांचे मार्गदर्शनाखाली शिशिरकुमार देशमुख, सचिन रणशेवरे, गोविंद गोल्हार, व्ही जी धामणे, बी जी खेडकर, अंबादास पालवे, सचिन धोंडे, एस बी साळवे, अरुण मोरे, हेमंत खंडागळे, सागर द्वारके, होमगार्ड देविदास उमाप, पांडुरंग गीते, प्रवीण तांगडे, यांनी केली आहे गुन्हाचा तपास पोसई सचिन रणशेवरे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment