कोविडमुळे रुग्णवाहिकांना दररोज मोफत 50 लिटर पेट्रोल-डिझेल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 22, 2021

कोविडमुळे रुग्णवाहिकांना दररोज मोफत 50 लिटर पेट्रोल-डिझेल

 कोविडमुळे रुग्णवाहिकांना दररोज मोफत 50 लिटर पेट्रोल-डिझेल

रिलायन्स पेट्रोलपंपाचा अभिनव व उपयुक्त उपक्रम

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रिलायन्स पेट्रोल पंपाच्यावतीने कोरोना काळात सेवा देणार्‍या सर्व रुग्णवाहिका यासह ऑक्सिजन सिलिंडर वाहतुक करणार्‍या वाहनांना दररोज 50 लिटर डिझेल अथवा पेट्रोल मोफत देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आली असल्याची माहिती मिरजगाव रिलायन्स पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक डॉ संतोष गुरसुळे यांनी दिली. रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड मार्फत मोफत इंधन देण्याचा उपक्रम देशभर राबविला जात आहे त्याचा फायदा रोज नगर शहर सह जिल्ह्यातील रुग्णवाहिका घेत आहेत आज या उपक्रमाची पाहणी प्रांताधिकारी अर्चना नष्ठे , नानासाहेब आगळे तहसीलदार, झळ यादव साहेब ,इऊज गोविंद जाधव 108 ऍम्बुलन्सच्या जिल्हा व्यवस्थापिका कांचन बिडवे यांनी केली यावेळी  पंप मॅनेजर संतोष गुरसुले व सर्व पंप स्टाफ उपस्तिथ होता यावेळी सर्व अधिकार्‍यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. दि 15 मे पासून अनेक रुग्णवाहिका आणि आपत्कालीन काळात सेवा देणारे वाहन याचा लाभ घेत असल्याची माहिती व्यवस्थापक डॉ संतोष गुरसुळे, विभागीय व्यवस्थापक अभिजीत गिजगे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment