आरोग्य कर्मचार्‍याचा कामबंद आंदोलनाचा इशारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 22, 2021

आरोग्य कर्मचार्‍याचा कामबंद आंदोलनाचा इशारा

 आरोग्य कर्मचार्‍याचा कामबंद आंदोलनाचा इशारा


कर्जत -
उपकेंद्र भोसा येथील कर्यरत आरोग्य सेविका श्रीमती शेळके एम.सी.यांना अर्वाच्य व अश्लील भाषेत शिवीगाळ करुण मारहाण करण्याची धमकी देणार्‍यावर दोन दिवसात कोणतीच कारवाई न झाल्याने तालुक्यातील आरोग्य विभागाने काम बंदचा इशारा दिला आहे.
दि.19-5-21 रोजी रुग्ण सेवा करीत असताना प्राथमिक आरोग्य केंद्र कुळधरण अंतर्गत असलेल्या भोसाउपकेंद्रातील कर्यरत आरोग्य सेविका एम. सी. शेळके यांना उपकेंद्रात येऊन  महेन्द्र चव्हाण वय 28 रा.भोसा यांनी अर्वाच्य व अश्लील भाषेत शिवीगाळ करुण मारहाण करण्याची धमकी दिली याबाबत शेळके यांनी कर्जत पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली मात्र सदर व्यक्तीवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे कोरोना सारख्या गंभीर काळात ही आरोग्य विभागातील कर्मचार्‍याच्या सुरक्षिततेसाठी तालुक्यातील सर्व आरोग्य यंत्रणांनी दि 22-5-21 पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देणारे निवेदन दि 21 मे रोजी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधीकारी अमोल जाधव व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना दिले आहे. या प्रकरणी आरोपीवर त्वरीत कार्यवाही करण्यातयावी अन्यथा कर्जत तालुका आरोग्य विभागातील सर्व संघटना यांचे वतीने  दि 22-5-21 पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचे करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे, या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, प्रा.आ.केंद्र कुळधरणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे, प्रा.आ.केंद्र राशिन वैद्यकीय अधिकारी डॉ. व्हरकटे, प्रा.आ.केंद्र चापडगांवचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, प्रा.आ.केंद्र बारडगांव वैद्यकीय अधिकारी डॉ. भोंडवे, प्रा.आ.केंद्र मिरजगांव डॉ. दराडे, यांचे सह सर्व तालुक्यातील आरोग्य प्रतिनिधि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment