दिव्यांगाचा निर्वाह भत्ता जमा करा ... अन्यथा 2 जूनपासून मनपासमोर आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 24, 2021

दिव्यांगाचा निर्वाह भत्ता जमा करा ... अन्यथा 2 जूनपासून मनपासमोर आंदोलन

 दिव्यांगाचा निर्वाह भत्ता जमा करा ... अन्यथा 2 जूनपासून मनपासमोर आंदोलन

प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे यांचा इशारा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महापालिकेने गेल्या 17 महिन्यांपासून बेरोजगार दिव्यांगांचा निर्वाह भत्ता थकला असून  वारंवार पत्रव्यवहार करून, भेटी घेऊन  महापालिकेच्या अधिकार्यांना अजूनही उपरती होत नाही. कोरोनाच्या भयानक संकटातून आपण सर्वजण जात असताना, दिव्यांगांना त्यांच्या हक्काची रक्कम तात्काळ मिळण्यास महापालिका का विलंब करीत आहे? हे न उलगडणारे कोडे आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी  दिव्यांगाना त्यांचे अधिकार प्रदान करावे,  त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्या गरजा पूर्ण कराव्यात असे आदेश दिले आहेत, परंतु अहमदनगर महापालिकेतल्या अधिकारी कुंभकर्णाप्रमाणे  गाढ  झोपेत असून दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत त्यांना कोणतीही संवेदना राहिली नाही. त्यामुळे येत्या  2  जून ला महापालिकेसमोर प्रहार दिव्यांग संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.लक्ष्मण पोकळे यांनी सांगितले.
प्रहार दिव्यांग संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या  लॉकडाउनचा कालावधी असल्यामुळे दिव्यांगांना कोणतेच उत्पन्नाचे साधन नाही, रोजगार बंद आहेत. शासनाने त्यांना निर्वाहभत्ता मंजूर केला आहे. तो त्यांना दिला पाहिजे तर त्यांना या आर्थिक संकटातून बाहेर पडता येईल. प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने वेळोवेळी महापालिकेतील अधिकारी, पदाधिकार्यांच्या भेटी घेतल्या, निवेदन दिली. परंतु  याची  कोणतीही दखलही या अधिकार्यांनी घेतली नाही. त्यामुळे आंदोलन केल्याशिवाय दिव्यांगांना 17 महिन्यांचा प्रलंबित निर्वाहभत्ता मिळणार नसेल तर दिव्यांग प्रहार संघटना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा लक्ष्मण पोकळे यांनी दिला आहे. या निवेदनावर दिव्यांग प्रहार संघटनेचे शेख, बाळासाहेब पुंड, हजारे आदींच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here