रुग्णालयासमोर प्राणवायुच्या कांड्या उभ्या करुन रुग्णांची दिशाभूल ! प्राणवायू असल्याची बनवाबनवी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 24, 2021

रुग्णालयासमोर प्राणवायुच्या कांड्या उभ्या करुन रुग्णांची दिशाभूल ! प्राणवायू असल्याची बनवाबनवी

 रुग्णालयासमोर प्राणवायुच्या कांड्या उभ्या करुन  रुग्णांची दिशाभूल ! प्राणवायू असल्याची बनवाबनवी 



नगरी दवंडी

नेवासा- अहमदनगर जिल्यासह राज्यात ऑक्सिजन सिलेंडर व बेडच्या तुटवड्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांची मोठी हेळसांड होत असून प्राणवायूमुळे रुग्णांची तगमग सुरु असून उपचारा अभावी रुग्ण दगावत असल्याचे चिञ दिसून येत असतांना आता नेवासा तालूक्यातील काही कोविड रुग्णालयासमोर प्राणवायूच्या कांड्या उभ्या करुन प्राणवायू असल्याचा अभास निर्माण करुन नविनच बनवा बनवी सुरु असून कोरोनाबाधीत रुग्ण दाखल करुन घेण्यासाठी अजब फंडा काही रुग्णालयाकडून केला जात आहे.

   कोरोनाबाधीतांची संख्या दिवसागणिक शंभर,दिडशे,दोनशे अशा प्रमाणात दररोज नेवासा तालूक्यात वाढत चालली असल्यामुळे कोविड सेंटरमध्ये बेड व ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला दिसून येत आहे.माञ ऑक्सिजनमुळे रुग्णांची मोठी तगमग सुरु आहे.याचा फायदा उचलत काही रुग्णालयांनी चक्क रुग्णालयासमोर ऑक्सिजन कांड्या उभ्या करुन ऑक्सिजन असल्याचा अभास तर निर्माण केला जात नाही ना ? असा सवाल सुज्ञ जनतेतून उपस्थित केला जात आहे. सध्या कोरोना रुग्णांना बेड व ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे रुग्णालयासमोर उपचारा अभावी रुग्ण दगावत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत तर काही रुग्णालयात हजारो रुपये उपचारासाठी खर्च होवूनही रुग्णांचा मृत्यु होत आहे.तर दुसरीकडे ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्यामुळे नेवासा तालूक्यातील रुग्णांना जिल्ह्यासह बाहेर उपचार घेण्यासाठी जावे लागत असतांना काही रुग्णालयांनी ऑक्सिजन कांड्या रुग्णालयाबाहेर उभ्या करुन रुग्णांची आता नविनच बनवाबनवी सुरु केल्याची चर्चा रुग्णांच्या नातेवाईकांडून होत असून रुग्णालयात रुग्ण दाखल करुन घेण्यासाठी रिकाम्या ऑक्सिजन कांड्या रुग्णालयासमोर ठेवल्या जात आहेत. हा प्रकारही आता तालूक्यात चर्चेचा विषय ठरला जात आहे.

    काही रुग्णालयात नेमका दवाखाना कोणता 'त्या' वैद्यकिय अधिकाऱ्यांची पदवी काय याचा उल्लेख न करता केवळ एम.डी फलक झलकावून रुग्णांना केवळ नवजिवन देण्याचा प्रताप करुन आपली कुवत झाकून ठेवण्याचा प्रतापही काही वैद्यकिय सेवा पुरवणाऱ्यांकडून केला जात असून 'अंधेरी' नगरीचा चौपट "राजा" सुरु असल्याचे या निमित्ताने सर्व सामान्य जनतेतून बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment