नेवासा फाटा येथे भाजी खरेदीसाठी रोजच होते तुडुंब गर्दी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 23, 2021

नेवासा फाटा येथे भाजी खरेदीसाठी रोजच होते तुडुंब गर्दी.

 नेवासा फाटा येथे भाजी खरेदीसाठी रोजच होते तुडुंब गर्दी.

भाजी विक्रेते ठरतायत प्रशासनासाठी डोकेदुखी.  नगरी दवंडी

नेवासा  - महाराष्ट्र शासनाने कोरोणाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन  या उपक्रमामार्फत अत्यंत कडक निर्बंध जारी केले असताना अनेक व्यवसायांना निर्बंध घालून दिले आहेत .भाजीपाला  विक्रेत्यांना फक्त दारोदारी जाऊन विक्री करण्याचे नियमांमध्ये बंधनकारक असताना नेवासा फाटा येथे मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला प्रत्यक्षात केराची टोपली दाखवली जात आहे .अगदी रस्त्यावरच  आणि चौका चौकांमध्ये भाजी विक्रेते आपली दुकाने मांडून बसले आहे. आणि या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे या होणार्या गर्दीकडे प्रशासन मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत आहे.यामुळे आता नेवासा तालुक्यातील कोरोणाचे वाढणारे प्रमाण खाली येणार की खूप मोठ्या प्रमाणात वाढणार असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here