अशोक कुटे व गोरख गहिले यांच्या पुढाकारातून कोव्हिड सेंटरला १५ बेडचे वितरण कौतुकास्पद - डॉ. संजय कळमकर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 24, 2021

अशोक कुटे व गोरख गहिले यांच्या पुढाकारातून कोव्हिड सेंटरला १५ बेडचे वितरण कौतुकास्पद - डॉ. संजय कळमकर.

 अशोक कुटे व गोरख गहिले यांच्या पुढाकारातून कोव्हिड सेंटरला १५ बेडचे वितरण कौतुकास्पद - डॉ. संजय कळमकर. 



नगरी दवंडी

अ. नगर प्रतिनिधी :नुकताच केडगाव तालुका नगर येथील अशोक कुटे व गोरख गहिले यांच्या पुढाकारातून कोविड सेंटरला 15 बेड वितरणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे प्राथमिक शिक्षक समितीचे सांस्कृतिक मंडळाचे राज्याध्यक्ष डॉक्टर संजय कळमकर म्हणाले.

जेऊर येथील व चिचोंडी पाटील येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळून १५ चांगल्या दर्जाचे बेड कोविड सेंटरला कायमस्वरूपी भेट देण्यात आले. यासाठी नगरचे तहसीलदार पाटील साहेबांचे मार्गदर्शन लाभले.

नेवासा येथे कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक अशोक कुटे व अरणंगाव येथील उद्योजक गोरख गहिले यांनी वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला दोन बेड भेट देण्याचे ठरवले होते. त्याच काळात कुटे सरांचे साडू बंधू पंचगंगा उद्योग समूहाचे संचालक मा .प्रभाकरराव शिंदे पा व श्री काकासाहेब शिंदे यांनी नेवासा कोविड सेंटरला 100 बेड  , २ मिनी अँम्बुलस, २० नवीन ऑक्सिजन सिलेंडर कायमस्वरूपी भेट दिले होते... आपल्या साडू बंधूंची प्रेरणा घेऊन या दोघांनी मोठ्या प्रमाणात बेड व इतर मदत भेट देण्यासाठी सोशल मीडिया वर आव्हान केले. यामध्ये भिंगार येथील कै. गोपाळराव झोडगे यांचे पुत्र पिंटूशेठ झोडगे यांनी फक्त व्हाट्सअप च्या आवाहनावर  काही ओळख नसताना रोख स्वरूपात बेड साठी भरीव मदत दिली. तसेच केडगाव येथील इयत्ता चौथी च्या वर्ग मित्रांचा एक  व्हाट्सअप वर झेडपी ग्रुप आहे.त्या ग्रुपमधील सात मित्रांनी सात बेड भेट दिले. यांच्यामार्फत अजुनही केडगांव व इतर कोव्हिड सेंटरला वेगळी मदत देण्यात येणार आहे. मदत देण्यासाठी समाजाने 9850203914 नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. 

पिंटूशेठ गोपाळराव झोडगे, गोरख काशिनाथ गहिले , मा बबनराव लोंढे, कै .प्रभाकर गुंड , जयश्री अशोक कुटे ,योगेश कटारे सर, संदीप सायंबर, साळुंखे साहेब ,बाळासाहेब पठारे ,गणेश नन्नवरे, योगेश विजय हजारे ,प्रविण येवले ,मंगेश सातपुते , संदीप सर्जेराव कोतकर, यांनी बेड दिले. 

 या उपक्रमासाठी जेऊरचे डॉ.  कर्डिले , चिचोंडीचे डॉ. नेवसे, जयश्री कुटे, महेश पवार, वैभव निकम, श्रद्धा  मॅडम , नंदू वाव्हळ , श्री गणेश लंघे, मराठी सोयरीक संस्थेचे कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. तसेच मराठा उद्योजक लॉबी ,सकल मराठा समाज,  विविध प्राथमिक शिक्षक संघटना हे देखील वेगवेगळ्या पद्धतीने मदत कार्य करत आहेत..

No comments:

Post a Comment