मनपा कामगार युनियन२७ एप्रिल ला करणार बेमुदत धरणे आंदोलन! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 23, 2021

मनपा कामगार युनियन२७ एप्रिल ला करणार बेमुदत धरणे आंदोलन!

 अहमदनगर महानगरपालिका कर्मचार्‍यांच्या वेतन आणि पेन्शनचा प्रश्न गंभीर! कामगार युनियननं केल्या विविध मागण्या! २७ एप्रिल कामगार करणार बेमुदत धरणे आंदोलन!नगरी दवंडी

अहमदनगर - अहमदनगर महानगरपालिकेच्या कामगारांचं वेतन आणि पेन्शनचा प्रश्न गंभीर झाला असून राज्यशासन यासंदर्भात बेफिकीर आहे तर अहमदनगर महानगरपालिका उदासिनता दाखवित आहे, असा आरोप कामगार युनियनचे अध्यक्ष काॅम्रेड अनंत लोखंडे यांनी केलाय.

काॅम्रेड लोखंडे यांनी यासंदर्भात महापौर बाबा वाकळे यांना एक निवेदन दिलंय. यामध्ये लोखंडे यांनी म्हटलंय, की कोरोनाच्या संकटात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता महानगरपालिकेचे कामगार राबताहेत.

या कामगारांना संनिटायझर, मास्क, जम बूट आदी सुविधा तातडीनं द्याव्यात. कामगारांच्या घरात कोणी आजारी असेल तर त्वरित बेड, आॅक्सिजन, रेमडिसिविर इंजेक्शन आदी उपलब्ध करुन द्यावेत.

वेतन आणि पेन्शन मिळत नसल्यानं कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यशासनाच्या मवीन नियमानुसार कार्यालयीन कामगारांची १५ % आणि अत्यावश्यक सेवेतल्या कामगारांची ५० % उपस्थिती ठेवण्याबाबत कार्यालयीन आदेश देण्यात यावेत.

दरम्यान, या सर्व मागण्या मान्य न झाल्यास दि. २७ एप्रिलपासून महानगरपालिकेचे कामगार बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here