ऑक्सिजनसाठी शरद पवार मैदानात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 23, 2021

ऑक्सिजनसाठी शरद पवार मैदानात

 ऑक्सिजनसाठी शरद पवार मैदानात; साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आदेशनगरी दवंडी

 मुंबई - राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून ऑक्सिजनची समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी  राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवारांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची प्रमुख संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे.

साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी, असं पत्र शरद पवारांनी सर्व कारखान्यांना लिहलं आहे. राज्यातील सर्व सहकारी कारखाने तसेच 190 खाजगी कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. शरद पवारांच्या सूचनेनुसार मांजरीतल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. याशिवाय जे कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावं, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

No comments:

Post a Comment