शहरातील हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 7, 2021

शहरातील हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर

 शहरातील हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीरनगरी दवंडी

अहमदनगर - शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी ६२६ नवे रुग्ण आढळून आले. सावेडी उपनगरातील रासनेनगर परिसरात एका दिवसात १३ रुग्ण आढळून आल्याने हा भाग कंटेनमेंट करण्यात आला आहे.

हा परिसर मंगळवारी पत्रे लावून बंद करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या १० ठिकाणांची यादी बांधकाम विभागाला दिल्याचे समजते.

कंटेनमेंट जाहीर करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागावर साेपविली आहे. शहरातील आणखी काही ठिकाणी कंटेनमेंट करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. केडगाव येथील शाहूनगर परिसर कंटेनमेंट करण्यात आला आहे.केडगाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्याने या भागातील कंटेनमेंट झोनची संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे.

दरम्यान आरोग्य विभागाकडून ज्या भागात कंटेनमेंट जाहीर केला जाईल, भागातील रस्ते काठ्या व पत्रे लावून बंद करण्याचे काम बांधकाम विभागाकडून केले जाणार आहे.

बांधकाम विभागाचे अभियंत्यांकडून परिसराची पाहणी करून हा भाग बंद करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment