ठराविक वेळेत सर्व दुकानं उघडण्याची अनुमती द्यावी- बाळासाहेब बोराटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 8, 2021

ठराविक वेळेत सर्व दुकानं उघडण्याची अनुमती द्यावी- बाळासाहेब बोराटे

 ठराविक वेळेत सर्व दुकानं उघडण्याची अनुमती द्यावी- बाळासाहेब बोराटे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद असल्याने दुकानदार, कारागिरांच्या रोजगारावर गदा आल्याने करोनाशी लढतांना प्रपंच कसा चालवायचा याची चिंता या सर्वसामान्यांना भेडसावत असुन, यातील अनेक जण रस्त्यावर येऊन चिंतन करीत, चर्चेत असल्याचे निदर्शनात येते. त्यामुळे मिनि लॉकडाऊन मधुन दुकानदारांना दुकानं उघडण्याची सवलत द्यावी, अशी मागणी नगरसेवक श्री. बाळासाहेब बोराटे यांनी केले आहे.
ओबीसी,व्ही.जे,एन.टी जनमोर्चाच्या अहमदनगर शहर जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीची सभा संघटनेचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि माझी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, डॉ. सुदर्शन गोरे, डॉ. श्रीकांत चेमटे, सौ. अनुरिता झगडे, सौ. वनिता बिडवे अदिंच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी श्री बोराटे बोलत होते.
तांगेगल्ली येथील संपर्क कार्यालयात सुरक्षित अंतर राखुन मोजक्या पदाधिकायांमध्ये ही बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेत सद्याच्या परिस्थितीत उपेक्षितांनी घरगुती छोटे छोटे व्यवसाय सुरु करून देता येईल का ? अपेक्षितांना मदत देता येईल, सरकारने पुन्हा एकदा रेशनवर 8 रू, 10 रू. किलो धान्य उपलब्ध करून द्यावे, गरजवंत रूग्णांना कमी खर्चात उपचार, औषधे मिळवून देणे, लोकांना प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठीच्या घरगुती उपय योजनांचा प्रचार करणे, अदि सुचना यावेळी सदस्यांनी केल्या, या सुचनाचा आढावा घेतांना श्री. फुलसौंदर व श्री. भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि ओबीसीचे नेते ना. विजय वड्डेटीवार तसेच ओबीसी,व्हीजे,एनटी जन मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष श्री.बाळासाहेब सानप यांना निवेदन पाठवुन या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले. जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडे सर्व प्रश्न मांडून परिस्थिची कल्पना देण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
आपण सर्व समन्वय व सुरक्षित अंतर राखून या सर्व सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. या बैठकीचा अहवाल ना. विजय वड्डेटीवार आणि जनमोर्चाचे संस्थापक श्री. बाळासाहेब सानप यांना त्वरीत पाठविण्यात येणार असुन, त्यांच्या सुचना मार्गदर्शन मागविण्यात येईल. या वरिष्ठांच्या सुचनांनुसार महिलाध्यक्ष, युवाध्यक्ष आणि नगर शहर ग्रामीण परिसरातील सदस्यांच्या नियुक्त्या या दोन- चार दिवसात कण्यात येणार असुन, त्याबाबत ही प्राथमिक चर्चा यावेळी करण्यात आली.
संघटनेचे शहरजिल्हा उपाध्यक्ष तथा बाराबलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. माऊली गायकवाड, जनमोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश सानप, जनमोर्चाचे सरचिटणीस सर्व श्री.रमेश बिडवे, प्रकाश सैंदर, अनिल इवळे, शामराव औटी, शशिकांत पवार, अभिजीत कांबळे, शेख नईम, विनोंद पुंड, फिरोज खान, सदस्य अशोक तुपे व माध्यम प्रमुख पत्रकार राजेश सटाणकर अदिंनी यावेळी चर्चेत भाग घेतला.

No comments:

Post a Comment