लालटाकी येथील जागा नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टचीच - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 8, 2021

लालटाकी येथील जागा नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टचीच

 लालटाकी येथील जागा नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टचीच

विश्वस्तांचा खुलासा : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सावेडी येथील लालटाकी भागातील सर्व्हे नं.119 सि.स.नं.6998 सदर जागा नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट रजिस्टर नं.एफ-17 यांच्या मालकी, वहिवाटीची होती व आहे, असे निवेदन ट्रस्टच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष युनूस सुलतान तांबटकर, सचिव इम्रान शफी अहेमद शेख, खजिनदार इम्रान जमीर खान, विश्वस्त फरहान खालीद खान, नवीद आरिफ तांबटकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर जागेत पूर्वीपासून बालवाडी अस्तित्वात होती व आहे. काही दिवसांपूर्वी किरण काळे यांनी वर्तमान पत्रात बातमी दिली. सदर जागा ही महापालिकेने रोझ गार्डन, सुशोभिकरण करावी, वास्तविक सन 2003 साली औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर जागा तत्कालीन जिल्हाधिकारी यांना आदेश देऊन नागोरी मुस्लिम जमात ट्रस्ट यांच्या जागेवरील संपूर्ण अतिक्रमण काढून ताब्यात द्यावी, त्यानुसार सदर जागा ही नागोरी मुस्लीम मिसगर जमात ट्रस्ट ऋ-17 तत्कालीन जिल्हा अधिकारी साहेबानी ताब्यात देऊन भुमापन अधिकारी यांनी 7/12 उतार्यावर ट्रस्टची नोंद लावलेली आहे. किरण काळे हे प्रशासनाची व समाजाची दिशाभुल करत आहेत. सदर संस्था ही अल्पसंख्याक असून, 1913 पासून अस्तित्वात आहे. सदर संस्थेचे तेथे शाळा व वैद्यकीय सेवा या करीता उपयोगात आणून मिसगर समाजातील गरजू लोकांना रोजगाराकरीता नियोजन, तसेच संस्थेतर्फे मिसगर समाजातील गरजू व विधवा महिलांना मदत दिली जाते. या सर्व गोष्टींचा विचार करण्यात यावा. तरीही कोणत्याही प्रकारचे निर्णय किंवा कुठलाही प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी नागोरी मुस्लिम जमात ट्रस्ट यांच्या विश्वस्त मंडळाशी चर्चा केल्याशिवाय कोणतेही निर्णय घेऊ नये, अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment