स्वाभिमानी मराठा महिला प्रदेशाध्यक्षपदी सौ. अर्चना धुळे-रोहोकले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 8, 2021

स्वाभिमानी मराठा महिला प्रदेशाध्यक्षपदी सौ. अर्चना धुळे-रोहोकले

 स्वाभिमानी मराठा महिला प्रदेशाध्यक्षपदी सौ. अर्चना धुळे-रोहोकले


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
स्वाभिमानी मराठा महासंघाची प्रदेश कार्यकारिणीची नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ.कृषिराज टकले यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक संपन्न झाली.  याप्रसंगी नाशिक विभागीय कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील कावरे, प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे, नाशिक विभाग अध्यक्ष दिपक शेळके, युवक प्रदेशाध्यक्ष कैलास रिधें, जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे आदि उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन संघटनेचे कामकाज आणखी वाढविण्यासाठी राज्यात विविध पदाधिकार्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. यामध्ये महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी सौ.अर्चनाताई विनोद धुळे-रोहोकले यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष म्हणाले, स्वाभिमानी मराठा महासंघाच्यावतीने राज्यभर विविध आघाड्यांवर काम सुरु असून, युवक, महिला, शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून संघटना विविध प्रश्नांसाठी लढा देत आहे. यामध्ये अनेकजण उत्फुर्तपणे सहभागी होत असून, चांगल्या कार्यामुळे संघटनेच्या माध्यमातून प्रश्नही सुटत आहेत. संघटनेचे काम अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्ती करुन संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यादृष्टीने महिला प्रदेशाध्यक्षपदी सौ.अर्चनाताई धुळे-रोहोकले यांचे संघटनेतील कामकाज पाहता त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली, असल्याचे सांगितले. नियुक्तीनंतर सौ.अर्चनाताई धुळे-रोहोकले म्हणाले, संघटनेच्या कार्यात आपण योगदान देत आहोत. संघटनेच्या विचाराने प्रेरित होऊन अनेकजण सहभागी होत आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here