रमजानचा रोजा सोडून त्याने केले प्लाझ्मा दान अझीम मुजावर या तरुणाने जपली सर्वधर्मसमभावाची परंपरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, April 18, 2021

रमजानचा रोजा सोडून त्याने केले प्लाझ्मा दान अझीम मुजावर या तरुणाने जपली सर्वधर्मसमभावाची परंपरा

 रमजानचा रोजा सोडून त्याने केले प्लाझ्मा दान

अझीम मुजावर या तरुणाने जपली सर्वधर्मसमभावाची परंपरा
नगरी दवंडी

पारनेर/प्रतिनिधी : 

मित्राच्या करोना बाधित वडिलांना करोनावर मात करण्यासाठी रक्तद्रवाची (प्लाइमा) आवश्यकता असल्याचे समजताच अझीम मुजावर या तरुणाने १४ एप्रिलपासून सुरू केलेले रमजानचे रोजे थांबवून रविवारी सकाळी रक्तद्रव दान केले.

नाशिक येथे अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेत असलेला अझीम तालुक्यातील कान्हूरपठारचा रहिवासी आहे. अझीम सोबत शिकणाऱ्या मिहिर पाटील या त्याच्या मित्राच्या वडिलांना करोनाची बाधा झाली. त्यावर मात करण्यासाठी रक्तद्रवाची आवश्यकता होती. मित्र मिहिर याने अझीम यास त्याबाबत माहिती दिल्यानंतर अझीम याने स्वतः रक्तद्रव दान करण्याची तयारी दर्शविली.

गेल्या डिसेंबरमध्ये अझीम यास करोनाची बाधा झाली होती. त्यावर  त्याने यशस्वी मात केली होती. मिहिर पाटील याचे ५८ वर्षीय वडील  वनविभागातून अलीकडेच सेवानिवृत्त झाले आहेत. करोनाचा संसर्ग झाल्याने ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.  त्यांना रक्तद्रव देण्यासाठी अझीमने तयारी दर्शविल्यानंतर डॉक्टरांच्या  सल्ल्याने त्याने रविवारी रुग्णालयात जाऊन प्लाइमा दान केले. गेल्या १४ एप्रिलपासून अझीम याने पवित्र रमजान सणानिमित्त महिनाभराचे उपवास सुरू केले होते. मात्र मित्राच्या वडिलांसाठी त्याने रोजे थांबवून रक्तद्रव दान करण्याचा निर्णय घेत समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. 


मित्राच्या वडिलांसाठी... तो आला पुढे

तालुक्याला सर्वधर्मसमभावाची परंपरा आहे. तोच वसा जपत अझीम याने मित्राच्या वडिलांसाठी रक्तद्रव दान करण्याचा निर्णय घेतला. मुजावर यांच्या कुटुंबाला सामाजिक कार्याचाही वारसा आहे. कान्हूरपठार येथे अझीम याचे चुलते अब्बास मुजावर यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेत वाहून जाणारे पाणी शिवारातच अडवण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. आता त्यांच्या पुतण्याने सामाजिक बांधीलकी जोपासत कुटुंबाचा वारसा जपला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here