ऑक्सिजन सुविधा असलेल्या कोविड सेंटरचे लोणीव्यंकनाथ मध्ये सोमवारी उद्घाटन नाहाटा ट्रस्ट व भुलेश्वरी शुगरचा उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, April 18, 2021

ऑक्सिजन सुविधा असलेल्या कोविड सेंटरचे लोणीव्यंकनाथ मध्ये सोमवारी उद्घाटन नाहाटा ट्रस्ट व भुलेश्वरी शुगरचा उपक्रम

 ऑक्सिजन सुविधा असलेल्या कोविड सेंटरचे लोणीव्यंकनाथ मध्ये सोमवारी उद्घाटन

नाहाटा ट्रस्ट व भुलेश्वरी शुगरचा उपक्रमनगरी दवंडी

श्रीगोंदा  - स्व.बन्सीलाल नाहाटा ट्रस्ट व पुणे येथील भुलेश्वरी शुगरने लोणीव्यंकनाथ येथील प्राथमिक शाळेत ऑक्सिजन सुविधा असलेले 50 बेड कोरोना हेल्थ केअर सेंटर करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती लोणीव्यंकनाथ चे उपसरपंच मितेश नाहाटा यांनी दिली. या कोविड हेल्थ केअर सेंटर मध्ये 10 बेड साठी सोमवार दि.१८ पासुन ऑक्सिजन सिस्टीम सुरु होईल सेंटर मध्ये औषधे, ओक्सिमीटर, तापमान मापक वजनमापक बी.पी.चेक मशीन बसविण्यात येणार आहे. तसेच रुग्णांची देखभाल करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका नियुक्त करण्यात आल्या आहेत.


 हे कोविड सेंटर तातडीने सुरु करण्यासाठी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा,सरपंच रामदास ठोंबरे, बाबासाहेब कुंदाडे, लालासाहेब काकडे, राहुल गोरखे, गणेश काकडे, आदि विशेष प्रयत्न करीत आहेत. लोणीव्यंकनाथ परिसरातील गावांमध्ये कोरोना पाॅझिंटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. गोरगरीब कुंटुबांतील रुग्णांना उपचार घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे हे कोविड सेंटर परिसरातील नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे.


कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे त्यामुळे प्रशासनावर ताण वाढला आहे. त्यामुळे आॅक्सीजन ची सुविधा असलेले पहिले कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला इतर गावातील संस्था दानशुर व्यक्तींनी अशी कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु केली गोरगरीब रुग्णांचे जीव वाचतील. -

मितेश नाहाटा उपसरपंच लोणीव्यंकनाथ

 

 

 कोरोनाची साखळी तोडण्यास मदत

लोणीव्यंकनाथचे उपसरपंच मितेश नाहाटा व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लोणीव्यंकनाथ कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु करण्याचा चांगला निर्णय घेतला त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत होईल.  - डॉ नितीन खामकर तालुका वैद्यकीय अधिकारी

No comments:

Post a Comment