Dysp संदीप मिटके यांची धडाकेबाज कामगिरी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 19, 2021

Dysp संदीप मिटके यांची धडाकेबाज कामगिरी.

 राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे खूनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी कानहू मोरे अटक,Dysp संदीप मिटके यांची धडाकेबाज कामगिरी.नगरी दवंडी

राहुरी - राहुरी येथील  पत्रकार  श्री रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी व तोफिक मुक्तार शेख वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह अन्य एक जण फरार होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून  पोलीस अधीक्षक  मनोज पाटील साहेब यांनी या गुन्ह्याचा पुढील तपासDy.S.P. संदीप मिटके  श्रीरामपुर यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. Dy.s.p.मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य. आरोपी कान्हो गंगाराम मोरे  वय 46  यास नगर औरंगाबाद  जाणारे रोडवरील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान समोरील हॉटेल गुरुदत्त  येथून शिताफीने अटक केली आहे

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली DySP   संदीप मिटके , सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख  , स फौ. राजेंद्र  आरोळे, पोहे का सुरेश  औटी, ,  पोलीस कॉन्स्टेबल  नितीन चव्हाण, रवींद्र माळी, नितीन शिरसाठ ,  आदींनी केली.

No comments:

Post a Comment