१ मे रोजी होणारा निकाली कुस्त्यांचा आखाडा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही रद्द ...पै.युवराज पठारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 27, 2021

१ मे रोजी होणारा निकाली कुस्त्यांचा आखाडा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही रद्द ...पै.युवराज पठारे

 १ मे रोजी होणारा निकाली कुस्त्यांचा आखाडा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही रद्द ...पै.युवराज पठारे

कोरोना च्या पार्श्वभूमीवर आखाडा रद्दचा निर्णय...



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी - 

तालुक्यात  कोरोनारुग्ण संख्या वाढत आहे शासनाने निर्बंध लागू केले आहे त्यामुळे पारनेर येथे १ मे रोजी होणारा निकाली कुस्त्यांचा आखाडा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही रद्द करण्यात आलेला आहे असे पारनेर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष पै.युवराजदादा पठारे यांनी जाहीर केले.

३३ वर्षाची परंपरा असलेला पारनेर येथील आखाड्याला दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातुन ४००-५०० नामांकित पैलवान मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात.नगर जिल्ह्यातही नामांकित पैलवान घडावे यासाठी पारनेर येथे  आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिव छत्रपती कुस्ती संकुलनात गेल्या ३ वर्षांपासून अनेक पैलवान सराव करत आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून कुस्तीचे आखाडे भरत नाहीत महाराष्ट्रात कुस्ती ला मोठा चाहतावर्ग आहे त्यातून लाखो रुपये उलाढाल होत असते मात्र स्पर्धा बंद असल्यामुळे अनेक पैलवानांवर उपासमारीची वेळ आली आहे.

राज्यभर मार्च ते मे महिन्यात पैलवानांसाठी अनेक ठिकाणी आखाड्याचे  व मैदानाचे नियोजन केले जाते.त्यातुन मिळणाऱ्या पैशातून अनेक पैलवानांना उदर निर्वाह चालत असतो पण गेल्या २ वर्षांपासून कोरोना आजारामुळे सर्व उद्योगधंदे जसे थांबले आहे तसेच कुस्ती क्षेत्रावर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे ,अनेक पैलवानांना कुस्ती क्षेत्र सोडून देण्याची वेळ आली आहे.कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यावर पारनेर येथे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कुस्ती आखाड्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे पारनेर आखाडा कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले. या बैठकीस योगेश मते , बाळासाहेब पठारे, पांडुरंग खोडदे, बाळासाहेब मते, भीमराव पठारे,चंद्रकांत कावरे,राजेंद्र पठारे,बबन चौरे,कुंडलिक पठारे,संभाजी चत्तर,गोकुळ शिंदे, सुभाष मते, राजेंद्र मते,संदीप कावरे,आर डी औटी व ग्रामस्थ  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment