भातोडी येथे कोरोना लसीकरण सुरू - सभापती सुरेखा गुंड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 27, 2021

भातोडी येथे कोरोना लसीकरण सुरू - सभापती सुरेखा गुंड

 भातोडी येथे कोरोना लसीकरण सुरू - सभापती सुरेखा गुंडनगरी दवंडी

चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)

राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.नगर तालुक्यातील भातोडी येथील वयोवृद्ध ग्रामस्थांना मेहकर येथे जाण्यासाठी अंतर जास्त लांब आहे म्हणून उपकेंद्र भातोडी येथे लस उपलब्ध करून दिली असल्याचे सभापती सुरेखा संदीप गुंड यांनी सांगितले.

याप्रसंगी शिवसेना नेते संदीप गुंड, शिवसेना तालुका उपप्रमुख निसार भाई शेख,भातोडीचे उपसरपंच राजूभाई पटेल, ग्रामपंचायत सदस्य अमोल कदम, विक्रम लबडे,घनश्याम राऊत ,जालिंदर शिंदे तसेच मेहेकरी आरोग्य केंद्राचा स्टाफ यांच्या उपस्थितीत कोव्हिड लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

कोरोना आजाराची सध्याची परिस्थिती खूपच भयावह आहे. सभापती गुंड यांनी सांगितले की, सर्वांनी घरातच राहावे बाहेर पडू नये जर कोणाला कोरोना आजारासंबंधी लक्षणे दिसून आल्यास,त्रास होत असल्यास  लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र,हॉस्पिटलला दाखवून कोरोना तपासणी करून घ्या. वेळेवर उपचार केले तर कोरोना आजार बरा होतो.फक्त भीतीपोटी अंगावर काढू नका आपल्याला ही कळकळीची विनंती असल्याचे सभापती गुंड म्हणाल्या. योग्य वेळी ट्रीटमेंट घ्या, आरोग्याची काळजी घ्या, मास्क व सॅनिटायझर चा वापर करा. एकमेकांना धीर द्या. आपल्यापासून दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. सध्या सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड आहे.रुग्णालयांमध्ये बेड मिळणे किंवा रेम डिसीवर इंजेक्शन मिळणे फार कठीण झाले आहे परंतु योग्य वेळी ट्रीटमेंट घेतली तर कोरोना आजार नक्कीच बरा होऊ शकतो. त्यामुळे शासनाने घालून दिलेले सर्व नियमांचे पालन करा. घरी रहा सुरक्षित रहा.आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन नगर तालुका पंचायत समितीच्या सभापती सुरेखा संदीप गुंड यांनी केले.

No comments:

Post a Comment