स्वाभिमानी शेतकरी करणार आंदोलन महात्मा फुले योजनेतील रूग्णाची इंदिरा हॉस्पिटलकडून लुट.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 10, 2021

स्वाभिमानी शेतकरी करणार आंदोलन महात्मा फुले योजनेतील रूग्णाची इंदिरा हॉस्पिटलकडून लुट....

 स्वाभिमानी शेतकरी करणार आंदोलन 

महात्मा फुले योजनेतील रूग्णाची इंदिरा हॉस्पिटलकडून लुट.... 



नगरी दवंडी

  जामखेड - जामखेड येथील इंदिरा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील रूग्णांची कागदपत्रे घेऊन पात्र लाभार्थ्यांकडून प्रोसेसिंग व इतर उपचार दाखवून लुट केली जात असल्याचा प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उघड करून सदर हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पात्र लाभार्थी यांनी अहमदनगर येथील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे सदर मागणीची दखल न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी दिला आहे. 

      याबाबत हकीकत अशी की, शहरापासून पाच कि. मी. अंतरावर असलेल्या भुतवडा येथील संभाजी आजिनाथ डोके  यांच्या पत्नीला १९ मार्च रोजी बाळंतपणासाठी इंदिरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. येथील डॉक्टरांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देता येईल यासाठी डोके यांच्याकडून सर्व कागदपत्रे घेतले यानंतर सदर सिजर करावे लागेल व एक रुपयाही खर्च येणार नाही असे सांगितले. 

     मात्र फाईल प्रोसेसिंगसाठी पाच हजार रुपये डोके यांना भरण्यास सांगितले त्यानुसार डोके यांनी पाच हजार भरले व नंतर डॉक्टरांनी सिजर केले यावेळी जन्मलेल्या बाळाचे वजन ३ किलो ३०० ग्रॅम भरले असताना काचेत आयसीयु मध्ये ठेवण्याची गरज नसताना बाळाला आयसीयूमध्ये तीन ते चार दिवस  ठेवले व कुठलाही उपचार केला नाही तसेच इतर खर्च पंधरा हजार रुपये भरुन घेतले. पत्नीच्या सिझर पूर्वी महात्मा फुले योजना अंतर्गत पैसे लागत नाही असे डॉक्टरांनी सांगितले होते मात्र त्यांनी गोड बोलून वेगवेगळे खर्चापोटी २३ हजार रुपये भरून घेतले. याबाबत तक्रारदार संभाजी डोके यांनी सदर रूग्णालयाकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्यांनी हा सर्व प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांना सांगितले. मंगेश आजबे यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे राज्य आयुक्त सूधाकर शिंदे यांच्याकडे सदर हाँस्पीटलच्या तक्रारींचा पाढा वाचला व सदर हाँस्पीटल रूग्णांची व शासनाची सातत्याने फसवणूक करत आहे. मागील वर्षभरापासून कोरोनाचे संकट व वेळोअवेळी होणारे लॉकडाऊन यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हातात पैसा राहीला नाही व त्यातच डॉक्टरांची होणारी लुटमार यामुळे सर्वसामान्य हतबल झाली आहे. सदर रूग्णालय सातत्याने असा प्रकार करत आहे यामुळे 

या हॉस्पिटलवर कारवाई करून सेंटरची मान्यता रद्द करावी व आजपर्यंत जेवढ्या रूग्णांचे पैसे घेतले ते परत करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी केली आहे सदर हॉस्पिटल व डॉक्टर यांच्यावर कारवाई न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा मंगेश आजबे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment