उद्योजक करिमभाई हंडेकरी यांचे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपीस जन्मठेपेची शिक्षा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 23, 2021

उद्योजक करिमभाई हंडेकरी यांचे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपीस जन्मठेपेची शिक्षा.

 उद्योजक करिमभाई हंडेकरी यांचे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपीस  जन्मठेपेची शिक्षा.नगरी दवंडी

अहमदनगर - अहमदनगर मधील प्रसिद्ध उद्योजक करिमभाई हंडेकरी यांचे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी अजहर मंजूर शेख यास जन्मठेप ची शिक्षा सुनावण्यात आली.शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम भाई हुंडेकरी यांचे कोठला परिसरातून अपहरण झाले होते त्यानुसार तोफखाना पो.स्टे. Cr.no.41/2019 भादवि कलम363,364(अ),34प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता Dy.s.p.संदीप मिटके व त्यांचे पथकाने अपहरणकर्त्यांची माहिती काढून अपहरण झाल्यानंतर काही तासातच हुंडेकरी यांची सुखरूप सुटका करून आरोपी क्र. 1) अजहर मंजुर शेख, 3) निहाल /बाबा मुशरफ शेख यांना अटक केले होते.सदर गुन्ह्याचा तपास Dy.S.P.संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली A.P.I. पिंगळे यांनी  तपास करून चार्जशीट न्यायालयात दाखल केले.सदर प्रकरणात ॲड.पवार  ए.बी.व Dy.s.p.संदीप मिटके यांनी जोरदार युक्तिवाद केला.सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री अशोक कुमार भिलारे साहेब यांनी आरोपींना जन्मठेप व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली पैरवी अधिकारी म्हणून . स फौ लक्ष्मण पो हे काँ  थोरात पि डी जे कोर्ट पैरवि अधिकारी नगर शहर  यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment