कोरोना संकटात नागरिकांना “शिवभोजन” थाळीचा आधार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 16, 2021

कोरोना संकटात नागरिकांना “शिवभोजन” थाळीचा आधार..

 कोरोना संकटात नागरिकांना “शिवभोजन” थाळीचा आधार..

ज्यांच्या घरात चूल पेटत नाही. निराधार, बेघर मजुरांना..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही.. रोजच्या जेवणाची भ्रांत आहे, ज्यांच्या घरात चूल पेटत नाही.. अशा निराश्रित, निराधार, बेघर, विस्मनक अवस्थेत भटकणार्‍या पुरुष, स्त्रियांना संजीवनी ठरलेली.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवडीची योजना म्हणजे “शिवभोजन थाळी” ही योजना कोरोना संकटात जिल्ह्यातील गोर गरिबांना दिलासा देणारे ठरले आहे.
चपाती 1, वाटी भाजी, 1 वाटी वरण, 1 वाटी भात. असणारी शिवभोजन थाळी कोरोना काळात मजुरी बंद असणार्‍यांना मोठा आधार वाटत आहे. आतापर्यंत ती पाच रुपयांना देण्यात येत होती. मात्र, नव्याने निर्बंध लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पासून ही थाळी मोफत केली आहे.कडक निर्बंधाच्या काळात कोणी उपाशी राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
काल पहिल्याच दिवशी नगर जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर या थाळीला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात 29 केंद्रांवरून थाळीचे वितरण करण्यात येत आहे. त्यांची क्षमता साडेतीन हजार थाळी प्रतिदिन अशी आहे. वेगवेगळ्या भागातील केंद्रांना वेगवेगळी क्षमता ठरवून देण्यात आलेली आहे. काल निर्बंधाच्या पहिल्याच दिवशी बहुतांश केंद्रांवरील थाळ्या दुपारी लवकरच संपल्या. त्यामुळे जिल्ह्यासाठी आणखी 800 थाळ्या वाढवून देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे. गरिबांच्या जेवणाची सोय म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली आहे. झाल्यामुळे गोरगरीब नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे. संचारबंदीच्या नियमांमुळे लोक तिथपर्यंत पोहचू शकतील का, अशी शंका व्यक्त केली जात असतानाच नगरमध्ये मात्र याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून शिवभोजन थाळी गरिबांसाठी वरदान ठरली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here