कोरोना नवा स्ट्रेन घातक, चाकवा देणारा.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 16, 2021

कोरोना नवा स्ट्रेन घातक, चाकवा देणारा..

 कोरोना नवा स्ट्रेन घातक, चाकवा देणारा..

डोळे होताय खराब.. ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः खोकला.. नी सर्दी.. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील ही लक्षण.. टेस्टिंग झाली. पॉझिटिव्हचा रिपोर्ट आला की उपचार. इथपर्यंत ठीक होतं. पण आता दुसर्‍या लाटेतील सध्याचा कोरोना स्ट्रेन अतिशय घातक व चकवा देणारा. सर्दी, पडसं असं कोणतही लक्ष नसताना हा ट्रेन डायरेक्ट फुफ्फुसांवर अ‍ॅटक करतोय. वैद्यकीय तज्ञ चक्रावून गेले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना तो एका मिनिटात विळखा घालतोय.

सध्या कोरोना चाचणी आरटीपीसीआर टेस्टमार्फत केली जाते. मात्र कोरोना आता आरटीपीसीआर चाचणीलाही चकवा देऊ शकतो, असे उघड झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह असताना तसेच लक्षणं असतानाही 15 ते 30 टक्के रुग्णांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येत आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांना असे रुग्ण आढळून आले ज्यांना ताप, खोकला होता. श्वास घ्यायला त्रास होत होता. सिटी स्कॅनमध्ये सौम्य असे ग्रे पॅच होते. ज्यामुळे कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट होते.तरीही त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. यापैकी काही रुग्णांची ब्रोन्कोअलेवलर लॅव्हेज करण्यात आलं. यामध्ये मात्र ते रुग्ण पॉझिटिव्ह आढळले ज्यांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह होती. यातून कोरोना व्हायरस आरटीपीसीआर टेस्टलाही धोका देण्यात सक्षम असल्याचे स्पष्ट होत आहे. तज्ञांच्या मते, या रुग्णांच्या घशात किंवा नाकात तेव्हा व्हायरस नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोरोना व्हायरसने कदाचित स्वतःला फुफ्फुसातील पेशींमध्ये आढळणारं प्रोटिन म्हणजे एसीई रिसेप्टरशी जो़डलं असावं. त्यामुळे जेव्हा ब्रोन्कोअलेवलर लॅव्हेजमध्ये फुफ्फुसातील द्रवाचा नमुना घेण्यात आला तेव्हा त्या कोरोना व्हायरस सापडला
तो कान डोळ्यांवर हल्ला करतोय - 2020च्या तुलनेत 2021 मध्ये कोरोनाची लाट अधिक उग्र रूप धारण करून आली आहे. कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. तर, दुसरीकडे या विषाणूमुळे बळी पडणार्‍यांची संख्या देखील वाढत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या वेळी कोरोना विषाणूचा संसर्ग कान आणि डोळ्यांच्या क्षमतेवर थेट हल्ला करत आहे. कोरोना व्हायरसचा नवीन प्रकारात या वेळी विषाणूजन्य ताप, ओटीपोटात वेदना, अतिसार, अपचन, गॅस, उलट्या, अतिसार, भूक न लागणे, शरीरदुखी आणि आम्लपित्त अशी लक्षणे दिसली. परंतु, संसर्ग वाढल्यानंतर कोरोनाची आणखी काही नवी लक्षणेही समोर आली आहेत.
कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत तज्ज्ञ काय म्हणतात? - एसजीपीजीआय आणि केजीएमयूसह बर्‍याच कोव्हिड हॉस्पिटलमध्ये, कोरोनामुळे दाखल झालेल्या रूग्णांमध्ये पाहण्याची आणि ऐकण्याची समस्या वाढली आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, येथे असे बरेच रुग्ण आहेत, ज्यांना दोन्ही कानांनी ऐकणेकमी झाले आहेत. याशिवाय कमी दिसत नसल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा गंभीर परिस्थिती उद्भवते तेव्हा कोरोना विषाणू शरीराच्या अनेक भागांवर परिणाम करतो.

कोरोनाच्या नवीन प्रकारासंबंधित दिलासादायक काय? - तज्ज्ञ पुढे म्हणाले की, कोरोनाने ज्या प्रकारे आपले स्वरूप बदलले आहे, त्यानंतर चिंता अधिकच वाढली आहे. यावर कोरोनाच्या प्रोटोकॉलचे अनुसरण करणे हा एकच उपाय आहे. तथापि, नवीन प्रकारात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाचा हा नवीन प्रकार प्रतिकारशक्ती चांगली असलेल्या रुग्णाला जास्त काळ त्रास देत नाही. असे रुग्ण 5-6 दिवसात बरे होतात. कोरोना विषाणूच्या या नव्या प्रकारामुळे लोक आजारी पडत आहे. रुग्ण उलट्या, अतिसार, गॅस, अपचन, आम्लपित्त, शरीरावर वेदना, शरीरात जडपणा येणे आणि ऐकण्याच्या समस्येने ग्रस्त आहेत.
1 मिनिटात संसर्ग - कोरोनाचा सध्याचा व्हायरस प्रचंड वेगाने पसरत आहे. रुग्णाच्या संपर्कात येतच अल्पावधित म्हणजे केवळ 1 मिनिटात तो दुसर्‍याला बाधित करतो. मागील वर्षी जी कोरोनाची लाट होती, त्यावेळी असा प्रकार नव्हता. मात्र यावेळी जी लाट आलेली आहे ती अत्यंत धोकादायक आणि शक्तीशाली आहे. पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर संसर्ग होण्यासाठी किमान 10 मिनिटे लागत होते. मात्र यावेळच्या लाटेत हा अवधी घसरुन 1 मिनिटावर आला आहे. महत्त्वाचं म्हणजे 30 ते 40 या वयोगटातील तरुणांना सर्वाधिक संसर्ग होत आहे. त्याचं कारणही साहजिक आहे, ते म्हणजे हाच वर्ग सर्वाधिक घराबाहेर असतो.
संपूर्ण कुटुंबाला बाधा - जर घरातील एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला, तर सध्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना आपल्या कवेत घेतो. कुटुंबच्या कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह येत आहे. आधी कोरोना रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र आता रुग्णांना उलटी आणि जुलाब होत आहेत. इतकंच नाही तर काहींना त्वचेवर लाल चट्टेही उमटत आहेत.

No comments:

Post a Comment