नगर तालुक्‍यात खेळते भांडवलाचे कर्ज वाटपास सुरूवात – माजी मंत्री मा.श्री.शिवाजीराव कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 19, 2021

नगर तालुक्‍यात खेळते भांडवलाचे कर्ज वाटपास सुरूवात – माजी मंत्री मा.श्री.शिवाजीराव कर्डिले

 नगर तालुक्‍यात खेळते भांडवलाचे कर्ज वाटपास सुरूवात – माजी मंत्री मा.श्री.शिवाजीराव कर्डिले नगरी दवंडी

नगर – पंतप्रधान मा.ना.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी कोरोना संकट काळामध्‍ये शेतक-यांना आर्थ्रिक मदत व्‍हावी यासाठी केंद्र सरकारच्‍या वतीने गायी म्‍हशीसाठी खेळते भांडवल योजना सुरू केली.  जिल्‍हा बॅकेच्‍या माध्‍यमातून खेळते भाडलच्‍या रूपाने नगर तालुक्‍यातील शेतक-यांना सुमोर 129 कोटी रूपयाची वाटप करण्‍यात आले. मात्र संपूर्ण महाराष्‍ट्रभर शेतक-यांना केलेल्‍या कर्ज वाटपाची चर्चा होवून टिकाटिप्‍पणी करण्‍यात आली. मात्र शेतक-यांनी पुन्‍हा एकदा दाखवून आहे की आम्‍ही किती प्रामाणिक असतो. मार्च अखेर सुमारे 116 कोटी रूपयाची वसुली झाली असून उर्वरित 13 कोटी रूपयाची वसुली जून अखेर होईल. शेतक-यांना खेळते भाडवलची योजना ही फक्‍त 2 व 4 महिने वापरता आल्‍यामुळे पुन्‍हा शेतक-यांना खेळते भांडवल योजना सुरू केले असून कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर शेतक-यांच्‍या खात्‍यावर पैसे वर्ग होणार असल्‍याचे प्रतिपादन  माजी मंत्री मा.श्री.शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

 नगर तालुक्‍यातील शेतक-यांना जिल्‍हया बॅकेच्‍या वतीने प्राथमिक स्‍वरूपात खेळते भांडवल कर्ज वाटपाचा शुभारंभ करताना माजी मंत्री मा.श्री.शिवाजीराव कर्डिले, बाजार समितीचे उपसभापती श्री.संतोष म्‍हस्‍के, माजी सभापती मा.श्री.हरिभाऊ कर्डिले , नगर तालुका विकास अधिकारी श्री.आनंदराव शेळके, शाखा अधिकारी श्री.महादेव कराळे, श्री.संजय भुतकर व शेतकरी वर्ग उपस्थित होता.


      माजी मंत्री मा.श्री. शिवाजीराव कर्डिले पुढे म्‍हणाले की, कोरोना संकट काळामध्‍ये शेतक-यांना आर्थिक मदत होणे गरजेचे असल्‍यामुळे जिल्‍हा बॅकेने पुन्‍हा दुस-या वर्षी  खेळते भांडवल कर्ज वाटप सुरू केले. या योजनेचा वर्षभर लाभ मिळणे गरजेचे आहे. मागील वर्षी शेतक-यांना फक्‍त 2 ते 4 महिने लाभ घेता आला. 31 मार्च ला घेतलेले कर्ज भरण्‍याची मुदत संपत असल्‍यामुळे शेतक-यांना केंद्र सरकारच्‍या सबसिडीचा लाभ मिळणार आहे. शेतक-यांनी मार्च अखेर कर्ज भरले नसते तर लाभ मिळाला नसता. यावर्षीही सबसिडीचा लाभ मिळण्‍यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. शेतक-यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरल्‍यामुळे बँकेचे कर्तव्‍य समजून पुन्‍हा खेळते भांडवल योजना सुरू केली आहे. या योजनेपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. शेतक-यांनी घेतलेले कर्ज वेळेत भरणे गजरेचे आहे. त्‍या माध्‍यमातून शेतक-यांना आर्थिक लाभ होवून कर्ज माफी होते. पिक विमाही मिळतो. खरीब ,रब्‍बी व खेळते भांडवलाचे घेतलेले कर्ज भरून शासनांच्‍या विविध योजनांचा  लाभ घ्‍यावा नगर तालुक्‍यातील शाखा गुंडेगांव, एमआयडीसी, जखणगांव, माळवी पिंपळगांव तसेच सोसायटी मधील गुंडेगांव, वडगांव गुप्‍ता, हिवरे बाजार, मांजूरसुंबा, यांनी 100 टक्‍के वसुली करून एक आदर्श निर्माण केला असे ते म्‍हणाले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here