स्वतःचा खासगी दवाखाना असून देखील कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना मोफत उपचार देणारे डॉ श्रीकांत पठारे महाराष्ट्रातील एकमेव डॉक्टर - महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 19, 2021

स्वतःचा खासगी दवाखाना असून देखील कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना मोफत उपचार देणारे डॉ श्रीकांत पठारे महाराष्ट्रातील एकमेव डॉक्टर - महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात

 स्वतःचा खासगी दवाखाना असून देखील कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना मोफत उपचार देणारे डॉ श्रीकांत पठारे महाराष्ट्रातील एकमेव डॉक्टर - महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात

     


 

नगरी दवंडी

पारनेर - पारनेर येथे नुकतेच महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक पार पडली. यावेळी ना. थोरात यांनी कोरोना काळात रुग्णांना सेवा देणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान केला. ना. थोरात म्हणाले की, डॉ श्रीकांत पठारे व त्यांचे कुटुंबीय गेल्या कित्येक वर्षांपासून समाजसेवेते आहे. त्यांच्या ओंकार हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अल्पदरात वैद्यकीय उपचार देत असल्याने ते पारनेर तालुकासह परिसरात परिचित आहेत. डॉ पठारे पंचायत समिती सदस्य असल्याने पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांची सेवा करत आहेत. त्यांचे स्वतःचे खासगी हॉस्पिटल असताना देखील त्यांची पत्नी डॉ पद्मजा पठारे व बंधू प्रमोद पठारे व सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी १०० बेडचे कोव्हीड सेंटर सुरू केले असून रुग्णांना मोफत उपचार देत आहेत. दिवसरात्र एक करून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी सेवा पठारे कुटुंब देत आहे. एवढी त्यागपूर्ण सेवा देणारे महाराष्ट्रातील एकमेव डॉ श्रीकांत पठारे आहेत.असे गौरवोद्गार काढून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप ना. थोरात यांनी टाकली. डॉ श्रीकांत पठारे व पठारे कुटुंबीयांचा आदर्श समाजातील डॉक्टरांनी घेणे गरजेचे असल्याचे मत ना. थोरात यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील डॉक्टरांनी डॉ पठारे यांचा आदर्श घेऊन काम केल्यास लवकरात लवकर कोरोनावर मात करायला सोपे होईल. डॉ श्रीकांत पठारे व त्यांच्या कुटुंबियांचे सामाजिक कामात नेहमी योगदान असते. कोरोना महामारीच्या काळात पठारे कुटुंबीय स्वतःचा खासगी दवाखाना असताना देखील कोव्हीड सेंटर उभारून रुग्णांना मोफत उपचार देत आहेत. राज्यातील डॉक्टरांनी पठारे कुटुंबाचा आदर्श घेऊन कोरोना काळात योगदान दिल्यास कोरोनाला महाराष्ट्रातून हद्दपार करायला जास्त दिवस लागणार नाहीत. - महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात

शाबासकीची थाप कोरोनग्रस्तांसाठी काम करण्यास ऊर्जा देते

कोव्हीड सेंटर सुरू केल्यापासून समाजातील जेष्ठ नागरिक,  सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व सर्वपक्षीय राजकीय मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे. ना. बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या पाठीवर टाकलेल्या कौतुकेच्या थापेने कोरोनग्रस्तांसाठी काम करण्यासाठी आणखी ऊर्जा मिळाली आहे.

No comments:

Post a Comment