लग्न करा! पण जपून! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, April 14, 2021

लग्न करा! पण जपून!

 लग्न करा! पण जपून!

नियम न पाळल्यास 10 हजारांचा दंड.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. आज रात्री 8 वाजेपासून दि 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात अनेक गोष्टींवर बंधने आणली जाणार आहेत. विवाह सोहळ्यातील उपस्थितीवरही मर्यादा आणल्या असून याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. विवाह सोहळ्याची नवी नियमावली शासनाने जाहीर केली आहे.

विवाह समारंभ  केवळ 25 लोकांच्या उपस्थितीत साजरे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मंगल कार्यालय किंवा विवाह समारंभ स्थळी येणार्‍या पाहुण्यांना सेवा देणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना लसीकरण करणे आवश्यक असेल अथवा त्यांनी वैध असणारे आर टी पी सी आर / आर ए टी / तृ एन ए टी / सी बी एन ए ए टी चाचणी नकारात्मक असण्याचे प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक असेल.या पैकी कोणीही लसीकरण केले नसेल अथवा वैध असणारे आर टी पी सी आर / आर ए टी / तृ एन ए टी / सी बी एन ए ए टी चाचणी नकारात्मक असण्याचे प्रमाणपत्र बाळगले नसल्यास सदर तरतुदींचे उल्लंघन करणार्‍या प्रत्येक व्यक्तीस रु 1000 दंड व आस्थापनेकडून रु 10000 वसूल करण्यात येणार आहेत. एखाद्या ठिकाणी गुन्ह्याची पुनरुक्ती होत असल्यास महासाथ ओसरेपर्यंत सदर जागा टाळेबंद करण्यात येईल व तेथे कोणत्याही पद्धतीचे संमेलन / एकत्रीकरण आयोजित करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. एखादा विवाह समारंभ धार्मिक प्रार्थनास्थळी आयोजित केल्यास उपरोक्त नियमांच्या अधीन राहून त्यासाठी परवानगी देण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here