स्व. अनिल भैया राठोड यांच्या नावाने कोविड सेंटर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 20, 2021

स्व. अनिल भैया राठोड यांच्या नावाने कोविड सेंटर

  स्व. अनिल भैया राठोड यांच्या नावाने कोविड सेंटरनगरी दवंडी

अहमदनगर - (प्रतिनिधी)नगर शहराचे २५ वर्ष लोकप्रिय लोकप्रतिनिधी असलेले माजी मंत्री अनिल भैया राठोड कोविड सेंटर शहरप्रमुख दिलीप दादा सातपुते यांच्या प्रयत्नातून अहमदनगर महानगरपालिका   यांच्या संयुक्त विद्यमानाने केडगाव शिवांजली मंगल कार्यालय , येथे शंभर बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले. यावेळेस प्रथम महापौर भगवान फुलसौंदर,शिवसेना नेते विक्रम अनिल राठोड, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, गिरीश जाधव,नगरसेवक दत्ता जाधव, बाळासाहेब बोराटे ,अमोल येवले, परेश लोखंडे ,संतोष ज्ञानअप्पा, सुनील सातपुते,मुकुंद जोशी,ओमकार सातपुते, टिनू भंडारी, मनीष गुगळे, विशाल वालकर, महेश राऊत शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.गेल्या वर्षी करोना जागतिक महामारी च्या कडक लॉकडॉउन मध्ये शिवसेनेच्या वतीने माजी मंत्री अनिलभैया राठोड यांनी स्वतः पुढाकार घेऊन मोफत जेवणाची व्यवस्था केली होती. आजवर जनता संकतात शिवसेनेच्या वतीने नेहमीच पुढाकार घेतला गेला होता. मात्र शिवसेनेचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी अनिल भैया राठोड यांच्या अकाली निधनानंतर पुन्हा एकदा शिवसेनेच्या शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौदर, विक्रम राठोड यांनी जनतेला दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात करोना रुग्ण संख्येत वाढ होत असून रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही हे वास्तव आहे. नेमकी यावेळी शिवसेनेचे कोविड सेंटर अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करेन.

कोविड सेंटरशी संपर्क साधण्यासाठी खालील नंबर वर कॉल करा

9922226161

9422226161

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here