खंडणी मागणारा गुन्हेगार अटकेत, एलसीबीची कारवाही. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 20, 2021

खंडणी मागणारा गुन्हेगार अटकेत, एलसीबीची कारवाही.

 खंडणी मागणारा गुन्हेगार अटकेत, एलसीबीची कारवाही.



नगरी दवंडी

अहमदनगर –  बालिकाश्रम रोड येथील दुकानदाराकडे खंडणीची मागणी करुन ८ हजार ५०० रुपयांचा दरोडा घालणाऱ्या टोळीतील एक आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हेने शाखेने कारवाई करून अटक केली आहे . अजय पटारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि  दिनांक २० मार्च२०२१ रोजी दुपारचे वेळी फिर्यादी श्री. अक्षय राजेन्द्र जाधव, वय- २० वर्षे, रा. जाधव मळा, बालिकाश्रम रोड, अहमदनगर हे त्यंचे बालिकाश्रम रोडवरील “रुबाब” या कपड्याचे दुकान मध्ये असताना आरोपी नामे विजय राजू पठारे, अजय राजू पटारे, दोघे रा. सिध्दार्थनगर, अहमदनगर यांनी व त्यांचे इतर साथीदारांनी मिळून फिर्यादी यांचे दुकानांमध्ये घुसून फिर्यादी कडे पैशाची व कपड्याची मागणी करुन दुकाणाचे नुकसान करुन फिर्यादीचा मोबाईल तसेच फिर्यादी यांचे दुकाणाजवळ असलेल्या सुनिल सायकल मार्ट या दुकाणामध्ये जावून दुकाण मालक यांना मारहाण करुन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ८,५००/-रु. किं.चा ऐवज दरोडा टाकून चोरुन नेला होता.


सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी तोफखाना पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. 1 २२८/२०२१, भादवि कलम ३९५, ३८६, ४५२, ४२७, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली कि, सदर गुन्ह्यातील आरोपी नामे अजय पटारे हा सिध्दार्थनगर येथील त्याचे घरी आला असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील सपोनि/मिथून घुगे, सपोनि/सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोना/सुनिल चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी, पोकॉ/सागर ससाणे, आकाश काळे अशांनी मिळून सिध्दार्थनगर येथे जावून आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेवून व सापळा जावून आरोपी नामे अजय राज़ पठारे, वय- २५ वर्षे, रा. सिध्दार्थनगर, म्युन्शीपल कॉलनी, अहमदनगर यास ताब्यात घेवून तोफखाना पो.स्टे. ला हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही तोफखाना पो.स्टे. करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटिल साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. विशाल दुमे साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, नगर शहर विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment