बोल्हेगाव, नागापूरच्या विकासासाठी निधीची तरतूद करावी : नगरसेवक वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 1, 2021

बोल्हेगाव, नागापूरच्या विकासासाठी निधीची तरतूद करावी : नगरसेवक वाकळे

 बोल्हेगाव, नागापूरच्या विकासासाठी निधीची तरतूद करावी : नगरसेवक वाकळे


अहमदनगर ः
अहमदनगर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेमध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी बोल्हेगाव नागापूरचा विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करावी, अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे करताना नगरसेवक कुमारसिंह वाकळे.नगरसेवक वाकळे पुढे म्हणाले की, बोल्हेगाव, नागापूर हे ग्रामपंचायत असलेला भाग नव्याने महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट झाला आहे. या भागाच्या मुलभूत प्रशश्नापासून विकासाचे प्रशन मार्गी लावावे लागत आहे. याचबरोबर दिवसेंदिवस नागरी वसाहती वाढत आहेत. विकसाकामांसाठी मोठ्या निधीची उपलब्धता करुन द्यावी. याचबरोबर शहरामध्ये वृक्षलागवड करावी. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची खरी गरज आहे. प्लॉट धारकांनी आपल्या बंगल्याच्या आवारामध्ये ऑक्सिजनयुक्त असे झाडे लावल्यास त्याला घरपट्टीमध्ये सवलत द्यावी. वृक्षांची लागवड करीत असताना 10 ते 12 फुटांचे वृक्ष शहरामध्ये लावण्यात यावे. दरवर्षी शहरातील एका रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावण्याचे उपक्रम हाती घ्यावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

No comments:

Post a Comment