सावेडीमध्ये सर्वसुविधांयुक्त आरोग्य सेवा देणारे हॉस्पिटल उभे करावे : नगरसेवक बारस्कर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 1, 2021

सावेडीमध्ये सर्वसुविधांयुक्त आरोग्य सेवा देणारे हॉस्पिटल उभे करावे : नगरसेवक बारस्कर

 सावेडीमध्ये सर्वसुविधांयुक्त आरोग्य सेवा देणारे हॉस्पिटल उभे करावे : नगरसेवक बारस्कर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रिकेच्या सभेमध्ये नगरसेवक रवींद्र तात्या बारस्कर यांनी आरोग्य प्रश्नावर चर्चा करीत असताना म्हणाले की, नगर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महापालिकेच्या माध्यमातून नगरवासियांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, आरोग्य सेवा ही नागरिकांची मुलभूत गरज व हक्क आहे ते महापालिकेने देणे कर्तव्यच आहे. सावेडी उपनगरामध्ये महापालिकेच्या मालकीचा सर्व सुख-सुविधा उपलब्ध असलेले हॉस्पिटल उभारण्यात यावे. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाने महिलांच्या प्रसुतिगृहाच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा देत आहे. त्याच धर्तीवर महापालिकेने सावेडी उपनगरातही असे रुग्णालय उभारावे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य वर्गातील नागरिक जास्त प्रमाणात राहत आहेत व औद्योगिक वसाहतीमध्ये कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आरोग्य सेवा दिवसेंदिवस महाग होत चालली आहे. तरी मनपा प्रशासनाने ही सेवा अत्यल्प दरात उपलब्ध होईल, अशी सुविधा उपलब्ध करून द्यावे. नागरिकांमध्ये कोरोना लसीकरणाबाबत समजगैरसमज पसरले आहे. सध्या नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग विषाणूचे रुग्ण्ही आढळत आहेत. लसीसंदर्भात नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत मनपाने पथनाट्याद्वारे जनजागृती करावी. मनपात अनेक कर्मचारी सांस्कृतिक क्षेत्रात निगडीत आहे. त्यांचे या कामात सहकार्य घ्यावे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधीक लसीकरण आवश्यक असून याबाबत मनपाने कारवाई करावी, अशा सूचना नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी मांडल्या.

No comments:

Post a Comment