छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक राजे होते- अभिषेक कळमकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 1, 2021

छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक राजे होते- अभिषेक कळमकर

 छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक राजे होते- अभिषेक कळमकर

अभिषेक कळमकर मित्र मंडळ व शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः तीनशे वर्षाहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही ते आपल्याला आजही हवेहवेसे अन् आदरणीय आदर्श वाटतात कारण शिवाजी महाराजांच्या आगळयावेगळया कार्यशैलीत व दूरदृष्टीत त्यांची बीजे आहेत प्रजेचा सांभाळ करणारे कनवाळू पिता तर बंडखोर फितूरांना देहदंडाची शिक्षा देणारे कर्तव्यकठोर न्यायनिष्ठूर राजाही होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक राजे होते असे प्रतिपादन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले. शिवजयंतीनिमित्त झोपडी कॅन्टीन परीसरात माजी महापौर अभिषेक कळमकर मित्र परिवार व शिवसेना नगर शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, योगिराज गाडे,संजय शेंडगे, दिलीप खैरे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, उमेश भांबरकर, पारूनाथ ढोकळे, संजय आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.
   दिलीप सातपुते म्हणाले की, ज्या काळात अनेक राजे गुलामगिरी करत होते त्या काळात जिजाऊ मॉसाहेबांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. एक नव्या पर्वाची सुरूवात झाली होती.

No comments:

Post a Comment