आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार व पालकमंत्री मुश्रीफ यांना निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 7, 2021

आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार व पालकमंत्री मुश्रीफ यांना निवेदन

 आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार व पालकमंत्री मुश्रीफ यांना निवेदन

नागरिक व व्यापार्‍यांत शासनाबद्दल रोष! शिथिलता आणुन दुकाने उघडण्यास परवानगी द्या.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः राज्य शासनाच्या मिनी लॉकडाउनच्या निर्णयामुळे नागरिक व व्यापार्‍यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय. या निर्णयास सर्वांचा विरोध असल्यामुळे शासनाने या नियमात शिथिलता आणून व्यापारी बाजारपेठा सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
   आ. संग्राम जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत टाळेबंदीच्या नियमावलीमुळे मोठ्याप्रमाणात सर्वसामान्य नागरिक व व्यापार्‍यांमध्ये  शासनाविषयी रोषाची भावना निर्माण झाली आहे. कारण या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार आहे. या निर्णयामुळे प्रथमतः थेट सगळ्यांची आर्थिक कोंडी होणार आहे. व्यापारी बाजारपेठा बंद राहिल्याने व्यापार्‍यासह त्या दुकानात काम करणारे कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे टाळेबंदीच्या नियमावलीस व्यापार्‍यांसह सगळ्यांचा विरोध आहे. ही नियमावली करताना निश्चितच सर्वसामान्य नागरिकांचे जिवाचे हितच लक्षात ठेवून करण्यात आली आहे. यामध्ये शासनाचा हेतू ही चुकीचा नाही. पण मागील वर्षात जेव्हा कोवीड-19 चा प्रादुर्भाव राज्यासह देशात वाढत होता. त्यावेळी कोवीड-19 शी कसे लढायचे किंवा या रोगाशी निगडीत शाश्वत अशी उपाययोजना आपल्याकडे उपलब्ध नव्हती. पण सद्यस्थितीत या रोगाशी लढण्याबाबत आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती व उपाय योजना उपलब्ध आहेत. त्यामुळे व्यापारी बाजारपेठा बंद न ठेवता त्या सुरू करण्यास शासनाकडून संबंधित यंत्रणेस आदेश होणे गरजेचे आहे. तसेच व्यापारी बाजारपेठा सुरू करताना कोवीड-19  चा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने उचित उपाययोजना करण्याबाबत सुचित करावे. जेणेकरून सर्वसामान्य नागरिक, कामगार, व्यापारी यांची आर्थिक कोंडी होणार नाही. कारण आताची आर्थिक कोंडी ही सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नाही. त्यामुळे शासनाने टाळेबंदीच्या निर्णयामध्ये शिथिलता करून व्यापारी बाजारपेठा सुरू होण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment